Skip to main content

शोधू किती बहाणे...

लेखक सांजसंध्या यांनी गुरुवार, 29/11/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे देहात जागणा-या, वणव्यात आग आहे इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे आशा जरी न होती, ना नांदते निराशा आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे संध्या २९.१२.२०१२
काव्यरस

प्यार का पहला ख़त - भावानुवाद

लेखक स्पा यांनी मंगळवार, 06/11/2012 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे | नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे || परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे ..

जागर

लेखक विश्वजीत दीपक गुडधे यांनी गुरुवार, 25/10/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जागर लोकांस आता जागवा पुन्हा विझल्या मशाली पेटवा पुन्हा डोक्यास टाळे लावती सदा सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा आजन्म सोसे बापुडा इथे सोशीक लोकां जागवा पुन्हा झोपून कैसे चालणार हो ? बळ आपलेही दाखवा पुन्हा संधी न येणे विश्वजित अशी संदेश माझा पोचवा पुन्हा • विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती. ==================================
काव्यरस

मुहाजिर् नामा

लेखक अश्फाक यांनी बुधवार, 03/10/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
युवराज पाटिलांचा संवेदना http://www.misalpav.com/node/22875 हा लेख वाचला . आणि फाळनिच्या दुखद आठवनीं वर आधारीत मुनव्वर राणा यांची मुहाजिर नामा ही गझल आठवली. मी मागे स्वतच्या धाग्यात टाकली होती http://www.misalpav.com/node/11661 . तेव्हा मला या गझल चे फारच थोडे शेर माहीत होते नंतर कळलं की ही दिर्घ गझल ८०० शेर मिळुन बनली आहे . तर यातीलच काही नविन शेर इथे शेअर करत आहे सोबतच नविन सभासदां साठी जुने शेर जोडुन देत आहे . मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं !

<पिवून हय क्यु?>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

का ग धरिला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/07/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला पाहिली होती सखे तू बेवफाई माझी श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला
काव्यरस

फुलांचे..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 19/06/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
उदंड झाले वार फुलांचे, उघडले न पण दार फुलांचे चुरगळणार्‍या, सुगंध देती कसे असे व्यवहार फुलांचे तुझा हात फिरला कवितेवर शब्द शब्द होणार फुलांचे मिळे न सहवासाचे अत्तर विस्कटले बाजार फुलांचे कत्तल माझ्या बागेची अन् तिला गळाभर हार फुलांचे मोक्ष मिळावा निर्माल्याचा जीवन मी जगणार फुलांचे -- उपटसुंभ

स्वप्नांचे..

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/06/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे नशेमधे असतानाही मी बरळलोच नाही कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे चटई निर्देशांक तयांच्या आयुष्याला द्या तुमच्यासाठी तुटले ज्यांचे अंगण स्वप्नांचे मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे - उपटसुंभ

साखर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/06/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
संत सोशी अंगी घावा, वाटी दार्‍यात साखर उसा चिरडूनी चक्री, येते फेर्‍यात साखर नेत्याच्या वल्गना, कधी जेत्याची पुंडाई देते खावया गोग्रासा, जैशी चार्‍यात साखर जणू नित्याची वंचना असा छळे मधुमेह, तोंडी लागले ते काढे, म्हणे सार्‍यात साखर डोळे लागेनात मूळी, होता कडू बाळझोप, दूधा फुंकरे आई जे, तीच्या वार्‍यात साखर घाली गुंजारव भुंगा, फूल नि:शब्द स्तब्ध घट्ट बन्द पंखुड्या, ठेवी पहार्‍यात साखर रुसलेली साजणी, तिचे बिंब कसे गोड? आरश्याच्या जणु पाठी होती पार्‍यात साखर

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी..

लेखक प्राजु यांनी रविवार, 17/06/2012 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आहेस तू जगी हे दाखव कधी कधी दगडास अंतरीच्या जागव कधी कधी होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा वठल्या मनास होते पालव कधी कधी नुसत्या हताशतेला गोंजारसी किती? अंगार अंतरीचा पेटव कधी कधी का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते तूही करून बघ ना आर्जव कधी कधी स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी मी एरवी तशीही, असतेच शांत पण नसते विचार करती, तांडव कधी कधी! आतूर मीच होते तुज पाहण्यास का? आतूरतोस तूही, भासव कधी कधी! ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी -प्राजु