मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर

वाचने 2725 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चाणक्य 12/02/2013 - 14:52
तरही गझल म्हणजे काय?
तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल. ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी 12/02/2013 - 16:54
सुरेख रचना:
जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
व्वाह!

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 17:40
लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले | दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-) ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)