Skip to main content

गहाणात ७/१२.....

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/02/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

किनारे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/02/2013 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल] मज दोन आसवांना हुलकावता न आले हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी उपटून यातनांचे तण काढता न आले निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती परक्याच आपल्यांना समजावता न आले मरणासवे कितीदा फसवे करार झाले जगणे नकोच होते, पण टाळता न आले अनुकूल सूचनांना वगळून चूक केली प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे कवटाळले उराशी, भिरकावता न आले जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 12/02/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर
काव्यरस

बेरीज

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 04/02/2013 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी भेटुनी जाते त्सुनामीसारखी मिरवतो आयुष्यभर ती झीज मी आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी ठरवले आहेस तू उत्तर तुझे, की चुकीची मांडतो बेरीज मी? -- उपटसुंभ
काव्यरस

विदूषक

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 29/01/2013 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय माझ्या रेखिले आहे कपाळी व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी मागते आहेस का आषाढ श्रावण वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या काळजामध्ये किती जपशील जाळी लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता दुःख येते प्रत्यही शोधीत आळी आसवांवर तेवते आयुष्य माझे वेदनांची साजरी करतो दिवाळी फुंकरी घालू नका जखमांवरी या मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी -- उपटसुंभ
काव्यरस

अन्यथा

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 26/01/2013 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीवना, भेट केव्हातरी अंतरीच्या उमाळ्यापरी आसवांच्या उधाणातही पापण्यांच्या रित्या घागरी भांडणावाचुनी व्हायची भेट माझी-तुझी का खरी? नाव मी भोवर्‍याला दिली, साद देती किनारे जरी जीवघेणा कडाका इथे, सांत्वनाच्या तिथे चादरी ! पाचवीलाच मी पूजिली शब्द झेलायची चाकरी अंत पाहू नको रे सुखा, साथ दे, अन्यथा जा तरी!
काव्यरस

घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 23/01/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना नाही जमेस काही आयुष्य मोजताना भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या काळीज सागराचे घेऊन हिंडताना ना घातली हवा तू राखेस एकदाही सारी हयात गेली अंगार शोधताना आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी आवाज होत नाही स्वप्नात बोलताना होतो बर्‍याचदा मी माझाच हाडवैरी बेभान अक्षरांचे आसूड ओढताना - उपटसुंभ
काव्यरस

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/01/2013 08:24 या दिवशी प्रकाशित केले.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,