...शब्द काही
कधी बोल तू नेमके शब्द काही
तुझ्या मनीचे नेटके शब्द काही
अजुनी मला ऐकू येतात तुझिया
पत्रातले बोलके शब्द काही
आता टाळतो मी तुझी भेट घेणे
छळती तुझे हासरे शब्द काही
आता बोलणे हे मुक्यानेच होते
आता जाहले पोरके शब्द काही
पुढे चालणे धर्म हाचि अपूर्व
विसरू कसे मागचे शब्द काही
काव्यरस
मिसळपाव