मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सल्ला

मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

मला भेटलेले रुग्ण - १०

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/41158 हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ? माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे .... _________________________________ कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!) ..... आता हाच पेशंट समोर बसलेला...

बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स बाबतीत ८ टिप्स

१००मित्र ·
बिझनेस नेट्वर्किंग आपल्या व्यवसायाचे जाळे वाढावे व अधिकाधिक योग्य व्यक्तींपर्यंत आपला व्यवसाय पोचावा, तसेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा ह्याकरीता उत्तम (एकच नव्हे) मार्ग म्हणजे बिझनेस क्लब्स द्वारे अत्यंत सुनियोजित पद्धतीने नेट्वर्किंग करणे. २०१४ पासून ते २०१६ पर्यंत मी स्वत: BNI ह्या नेट्वर्किंग क्लब चा सभासद होतो. बऱ्यापैकी सक्रीयही होतो. सध्या ब्रेक वर आहे.

कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

अज्ञात ·
गाभा: माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! १) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सां

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?

चित्रगुप्त ·
डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ? मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे. हल्ली कुणाकडेही जा, लहान मुले मोबाईल वा टीव्हीला चिकटलेली दिसतील. अगदी आठ-दहा महिने वयाच्या बाळांना देखील दूध पीताना वा काही खाताना कार्टून लावून दिले नाही, तर ती खात-पीत नाहीत, असे त्यांच्या आया सांगताना दिसतात.

होशंगाबादला काय काय बघावे? मिपाकर हैत का तिथे ?

चित्रगुप्त ·
मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे. जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा. ९९५३९०८२२१.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

मार्गी ·
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

चित्रगुप्त ·
. (याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे) डिअर ऑल, हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला.