कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
(याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे)
डिअर ऑल,
हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला.
मिसळपाव
डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.