चित्रपट: The Descendants!
हॉटस्टार वर काहीतरी शोधत असताना ह्या चित्रपटाबद्दल कळलं. शक्यतो मी गुगल करून अंदाज घेतल्याशिवाय चित्रपट बघत नाही. त्यात 'जॉर्ज क्लूनी(की क्लोनी)' आहे म्हटल्यावर बघायचं ठरवलं. त्याचे थोडेच चित्रपट बघितलेत पण त्याचा अभिनय, संवादफेक प्रचंड आवडलीय.
तस चित्रपटात नाट्य खूप नाही आहे आणि बऱ्यापैकी संथ वाटू शकतो. पण त्याच वेळी एकदम तरल आणि मनाला स्पर्शून जाणारा वाटला.
हवाई बेटांवर राहणार कुटुंब. नायकाच्या ३-४ पिढ्या आधी हवाई बेटांपैकी एका मुख्य भूभागाचे बऱ्यापैकी अधिकार नायकाच्या(मॅट) पूर्वजांकडे असतात. राजघराणे म्हणा ना. त्यायोगे आताच्या विस्तारलेल्या भल्या मोठ्या कुटुंबाकडे प्रचंड मोठी जमीन असते.
मिसळपाव
या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या.