फ्यूज -२
फ्यूज १
-------------
सकाळ झालेली असते. सुर्य उगवलेला असतो. नदी वाहत असते. मग मी त्यात आंघोळ करून घेतो. मला चांगलं वाटतं. मग मी आंडरवेअर पिळून घेतो. मग घरी जाऊन तारेवर टाकतो.
मग चौक असतो. चौकात लोकं आसतात. गाड्या रिक्षा टेम्पो भरपूर प्रमाणात पळत आसतात. मी गणपतीच्या देवळात जाऊन तिथला भात खातो. मला चांगलं वाटतं.
मग दुपार झालेली असते. ऊन पडलेलं असतं. चौथऱ्यावर सावली असते. सावलीत झोप चांगली येते. माणसाने कायम सावलीत झोपावे.
मग त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होत असते. संध्याकाळी माणसं सावलीतून उठून आपल्या आपल्या घरी जातात.
मिसळपाव