मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

उष्णकटिबंधीय वसंत

माहितगार ·

पुरणपोळ्या पचल्यावर साखरेच्या गाठ्या दिसल्यावर आभाळातली पाने खाली पडल्यावर जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर जेव्हा नसती हुरहूर संपते आणी मनी उधाण वारे शिरते तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले आणी ऋतुराज वसंत अवतरले. मुक्तक आवडले

वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

{आरती कोव्हिडची}

प्रसाद गोडबोले ·

निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या
ह्या ह्या ह्या ह्या..... या कोव्हिड देवाला एखादा बोकड अर्पण केला तर त्याच्या जाचातुन आपली सुटका होईल का? पैजरबुवा,

तुमच्या कवीता लई भारी आसतात. मनाला कधी गुदगुल्या करतात तर कधी टोचतात पण काहीतरी संदेश जरूर देतात. करोना करोना लागला जगताचे पाठी कोंदाटली सारी गावं अवघे घरा भिंती पाठी करोना करोना नाही उतारे मंतर रावा घरामंदी सारे तवा भेटाले नंतर करोना करोना जीव आला मेटाकुटी जन अंतरले एकमेका दुरावल्या गाठीभेटी कुणी झोपला खाटेवर कुणी पोचला घाटावर करोना करोना घ्या रे हातामंदी हात द्यारे बुडत्याला साथ करोना करोना लागल्या आवघ्याले भुका द्यारे घासतला घास करोना करोना कुणाच्या तोंडाला पदर कुणा नशिबी चादर करोना करोना साद घाली माणुसकीला आली नाथांची आठवू नका गंगा गोदामाई भेटवू म्हणे आतला विश्वंभर . करोना करोना पहीली लाट जगावर स्वार होती तेव्हां बहिणाबाईंच्या कवीता वाचत होतो. त्यातूनच स्फुर्ती मीळाली.

कर्नल साब, कडक स॓ल्युट . करोना करोना जीव आला मेटाकुटी जन अंतरले एकमेका दुरावल्या गाठीभेटी कुणी झोपला खाटेवर कुणी पोचला घाटावर करोना करोना घ्या रे हातामंदी हात द्यारे बुडत्याला साथ . ___/\__.

मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8 ________________________________________________________________________ आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस । विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥ पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी। चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी । आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*। ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥ लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*। मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या। घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही खेळ्या। निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या ॥ आरती

शीर्षक सुचले नाही

चांदणे संदीप ·

"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत पैजारबुवा,

म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल म्हणून म्हणतो चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय राती अर्ध्या राती जागं रहायच नाय

बाजीगर 22/12/2021 - 19:27
कवितेच्या प्रसव वेदना कशी येईल झोप सदना | पोस्ट ली कविता मिसळपाव चला आता येईल झोपेचा गाव | आता स्वप्नांचा डाव मांडणे.. मालवा हो (सं )दीप चांदणे ||

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 23/12/2021 - 14:38
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !

झोप येईनाच आज झोप हवी असताना जांभयाच्या येती लाटा वर तारे मोजताना काय आणून वहावे निद्रादेवीच्या चरणी झोप येऊन निवांत उद्या उजाडेल झणी किती थकून भागून देह दिला पसरून डोळ्यात बाहुल्यांना काय दिसते अजून? दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे एक मायेचा, माथ्याला हवा सांगणारा हात सोड उद्यावर, नीज खूप झाली आहे रात - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार ·
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद ·
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

शून्याशी गाठ

Bhakti ·

गॉडजिला 17/09/2021 - 18:17
तसं बरचं गहन आहे आणि म्हटलं तर सोपं अन सुटसुटीतही... ज्याला शून्य समजलें त्याला सगळे समजलें... सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही... शुन्य समजणे इतके सोपे नाही. आणि तितके अवघडही नाही

In reply to by गॉडजिला

राघव 20/09/2021 - 12:44
सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही..
हे वाचून "पूर्णमदं पूर्णमिदं..." हा श्लोक आठवला. पूर्ण आणि शून्य दोन्ही एकच असावे काय? ;-)

त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... हे पटलं. छान आहे कविता.अर्थपूर्ण आहे.

शून्यातून​ पाय फुटल्यासारखे आकडा भराभर धावतात... खुप खुप दमल्यावर शुन्याच्या मागे सामावतात... भोपळा भोपळा हिणवले पहिल्यांदा हाच तर गिरवला... डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले... कधी असंच पुढं आल्यावर तो 'पूज्य' राहत नाही कुठल्याशा वळणावर अचानक शून्याशी गाठ सुटत नाही... त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... -भक्ती

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!

तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .