✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शून्याशी गाठ

B — Bhakti, Fri, 09/17/2021 - 16:38
शून्यातून​ पाय फुटल्यासारखे आकडा भराभर धावतात... खुप खुप दमल्यावर शुन्याच्या मागे सामावतात... भोपळा भोपळा हिणवले पहिल्यांदा हाच तर गिरवला... डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले... कधी असंच पुढं आल्यावर तो 'पूज्य' राहत नाही कुठल्याशा वळणावर अचानक शून्याशी गाठ सुटत नाही... त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... -भक्ती

प्रतिक्रिया द्या
7711 वाचन

💬 प्रतिसाद (15)

उंहूं... शप्पथ, काय म्हंजे

राघव
Fri, 09/17/2021 - 17:45 नवीन
उंहूं... शप्पथ, काय म्हंजे कायबी कल्ला नाय... :-)
  • Log in or register to post comments

:) :)

Bhakti
Fri, 09/17/2021 - 17:50 नवीन
डोक्यातला कल्ला , कधी कल्लातर कलतो तर नायतर नुसता कल्ला करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

सुरेख.

गॉडजिला
Fri, 09/17/2021 - 18:17 नवीन
तसं बरचं गहन आहे आणि म्हटलं तर सोपं अन सुटसुटीतही... ज्याला शून्य समजलें त्याला सगळे समजलें... सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही... शुन्य समजणे इतके सोपे नाही. आणि तितके अवघडही नाही
  • Log in or register to post comments

सर्वकाही शून्यातून निर्माण

राघव
Mon, 09/20/2021 - 12:44 नवीन
सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही..
हे वाचून "पूर्णमदं पूर्णमिदं..." हा श्लोक आठवला. पूर्ण आणि शून्य दोन्ही एकच असावे काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

नक्कीच

गॉडजिला
Tue, 09/21/2021 - 11:14 नवीन
पूर्णत्व फक्त आणि फक्त शून्याकडे आहे. बाकी सर्वच आकडे फक्त अपूर्णत्व मोजायला निर्माण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आवडले!

राघव
Tue, 09/21/2021 - 21:50 नवीन
उत्तर आवडले! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

_/\_

Bhakti
Fri, 09/17/2021 - 18:52 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

वाह! आवडली.

प्राची अश्विनी
Mon, 09/20/2021 - 14:25 नवीन
वाह! आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्राची अश्विनी ताई!

Bhakti
Mon, 09/20/2021 - 16:11 नवीन
धन्यवाद प्राची अश्विनी ताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

छान

सरिता बांदेकर
Tue, 09/21/2021 - 11:37 नवीन
त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... हे पटलं. छान आहे कविता.अर्थपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद सरिता ताई!

Bhakti
Tue, 09/21/2021 - 14:06 नवीन
धन्यवाद सरिता ताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरिता बांदेकर

आवडली

श्रीरंग_जोशी
Wed, 09/22/2021 - 09:54 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद श्रीरंग!

Bhakti
Wed, 09/22/2021 - 11:06 नवीन
धन्यवाद श्रीरंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कैच्याकैकविता

रंगीला रतन
Wed, 09/22/2021 - 10:15 नवीन
कैच्याकैकविता हा टॅग लै आवडला :) समजाला वेळ लागला पण कविता छान वाटली.
  • Log in or register to post comments

=) धन्यवाद

Bhakti
Wed, 09/22/2021 - 11:07 नवीन
=) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा