Skip to main content

निसर्ग

मुसळधार पावसाने....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 18/09/2025 22:18 या दिवशी प्रकाशित केले.

या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र...... 

नाही दिली उसंत सावराया जिर्ण पाले

 मुसळधार पावसाने गर्विष्ठ ...... हवेल्यानां शांत केले

 हिरव्या माळरानी ना ही कळ्या उमलल्या 

मुसळधार पावसाने, व्यथा..... खडकात जिरून गेल्या 

अंडी फुटून गेली आळ्या मरून गेल्या 

मुसळधार पावसाने फुल..... पाखरांचा काळ केला 

कुंठल्या श्वान  चाळा विरह गीत गाती 

मुसळधार पावसाने Xxxx.... भादव्यात घात झाला 

त्या वाकड्या पुलांच्या (Z ब्रिज) रेषा सरळ झाल्या 

निघा निघा चिऊताई

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 21/03/2025 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
निघा निघा चिऊताई सारीकडे काँक्रीटले दाणा पाणी हरवले शहरी ह्या विषारी धुरके आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही उरलेली पाखरे ही भयसूचनांचे गाणे गाऊनी टिपती दाणे अखेरचे झोपू नका अशा तुम्ही वाचविण्या मृत्युक्षणी येईल का मग कोणी बाळाला ह्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई बाळासकट ती जाई कायमची!
काव्यरस

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

लद्दाख

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 22/09/2022 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूशास्त्राच्या अंकलिपीची पाने इथली उलटी रंगभारले पहाड, अवघड रस्त्याची वेलांटी रण वाळूचे पायतळी अन् हिमकण माथ्यावरती किती विरोधाभास पचवुनी फुलते इथली सृष्टी रंग नभाचे प्राशुनी वाहे निवळशंख हे पाणी रौद्र नि प्रशांत उभय रसांचे मिश्रण केले कोणी (नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

बरसणाऱ्या सरी|

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 16/09/2022 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/09/2022 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.

श्रावण

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 29/07/2022 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्याशार पाटीवर पांढरी शुभ्र रेघ ग्रीष्माच्या पाठीवर काळे काळे मेघ खरपुस ताबुंस मातीवर हिरवी चंद्रकळा प्राजक्ताच्या झाडाखाली मोतीयाचा सडा सुखावली धरती सुखावली मने इवल्या इवल्या रोपानी डुलती हिरवी राने चिंब झाले मन रुंजी घालतो साजण उभा भाऊ दारी म्हणे आला पंचमीचा सण मन पाखरू पाखरू पोचले आईच्या पायाशी डोळ्यात श्रावण भरून उभा साजण दाराशी २९-७-२०२२

ब्लिडींग हार्ट....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 26/05/2022 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

वसंतात मृगजळ खास

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/04/2022 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

आठवतो आज पुन्हा...

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 13/04/2022 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतो आज पुन्हा माझा गाव माझी माती सारं काही सोडले मी वितभर पोटासाठी. बरसून येती मेघ भिजूनिया जावे चिंब ओंजळीत पावसाचे झेलूनिया घ्यावे थेंब घेवूनिया हाती काठी जात होतो पोरं पोरं माळावरी चरावया घेऊनिया गुरं ढोरं. रानपाखरांच्या जैसे रानिवणी हिंडण्यात किती आठवू ते दिस मौज होती जगण्यात. मग सरले ते दिस हरवले बालपण शहरात पोटासाठी सुरू झाली वणवण. उलटले दिस मास किती काळ गेला पुढं तरी मना अजूनही आहे गवाचीच ओढ. सारं काही छान आहे दिस सरती सुखात जाई मन उडूनिया तरी गावाच्या रानात. https://youtu.be/LKb7VmDPTak