उष्णकटिबंधीय वसंत

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
25 Apr 2022 - 12:43 pm

वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?

त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)

वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले

वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ?
झाडाला फुले लागल्यावर
की
कोकीळेने कुहू कुहू केल्यावर
की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

Nisargअदभूतअननसअव्यक्तकविता माझीचाहूलजिलबीदुसरी बाजूमुक्त कवितारतीबाच्या कविताविडम्बनसोन्या म्हणेहिरवाईशांतरससंस्कृतीविज्ञान

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

25 Apr 2022 - 6:57 pm | कर्नलतपस्वी

पुरणपोळ्या पचल्यावर
साखरेच्या गाठ्या दिसल्यावर
आभाळातली पाने खाली पडल्यावर
जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर
जेव्हा नसती हुरहूर संपते
आणी मनी उधाण वारे शिरते
तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले
आणी ऋतुराज वसंत अवतरले.

मुक्तक आवडले

पाषाणभेद's picture

29 Apr 2022 - 9:46 am | पाषाणभेद

व्वा!

माहितगार's picture

29 Apr 2022 - 3:49 pm | माहितगार

अरे वा अजून एक प्रतिसाद आला, मला माझ्या कवितेपेक्षा कर्नल तपस्वींचा काव्य प्रतिसाद अधिक आवडला. दोघांचेही आभार

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 8:38 am | श्रीगणेशा

मुक्त कविता आणि कर्नल साहेबांचा प्रतिसाद दोन्हीही आवडलं!