मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...नवल!

सत्यजित... ·

राघव 18/07/2017 - 21:59
असे शब्द.. अर्थात ओथंबलेले! समजूनही पुन्हा वाचणे.. नवल! भाषेत अपुल्या कशी ती करामत! पुन्हा भाव "तो".. उमजणे.. नवल! गझल खूप आवडली. शेवटचा ट्विस्ट कातिल! :-)

नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

माम्लेदारचा पन्खा ·

गॅरी ट्रुमन 11/07/2017 - 16:31
जबराट. काव्य वगैरे माझा प्रांत नाही म्हणून मिपावरील कविता वगैरे वाचायच्या भानगडीत पडत नाही. या कवितेच्या शीर्षकावरून कविता नक्की कोणावर असणार याचा अंदाज आला आणि थोडी घाबरतच कविता बघितली. आणि ती प्रचंड आवडली :)

कविता आवडली. परंतु भाजपा केंद्रातच ठिक आहे. भाजपाचे राजकारण गुजरात धार्जिणे आहे त्यामुळे महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपा झाले तर अवघड आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण उ.ठा शिवाय पर्याय नाही.

सुज्ञ 12/07/2017 - 12:02
उधू ची भाषा भारी .. भारी शास्ताखान ,वाघनखे ,तलवारी .. तलवारी मुंबईत तुंबल्या गटारी. . गटारी विकासाच्या नावाने बोंबाबोंब .. बोंबाबोंब उद्धू .. तू माझ्याशी गोड बोल . गोड बोल

चौथा कोनाडा 12/07/2017 - 17:18
:-)))) भन्न्नाट जमलंय ! इस्को बोल्ते, करंट ट्रेण्डको कॅच करना ! आता मिपावर असल्या विडंबन गाण्याची स्पर्धा घ्यावी ! कंपूंनी त्याचे व्हिडो करुन पाठवावेत ! मिपाकट्टा मंग जबर्दस्त रंगेल :-)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

श्रीगुरुजी 13/07/2017 - 15:38
या कवितेत मला तरी काही इश्यू दिसत नाही. ही कविता एक साधी वात्रटिका आहे. यापेक्षा जास्त विनोदी विडंबने रोज माध्यमातू प्रसिद्ध होतात ज्यात पुढार्‍यांची मनसोक्त खिल्ली उडविलेली असते (उदा. 'सकाळ'मधील ढिंग टांग). या कवितेत बदनामीकारक, अश्लील, बीभत्स असे काहीही नाही.

वरुण मोहिते 13/07/2017 - 15:42
तुम्ही अमित शहा किंवा मोदींवर एक कविता करा ना . माझ्या नावाने प्रसिद्ध करतो . मस्त हसण्यासारखी .

एस 15/07/2017 - 16:20
एकच नंबर! मूळ आरजे मलिष्काचे गाणेही भारी आहे. खरेच बृहन्मुंबई महापालिकेला लाज वाटली पाहिजे. दर वर्षी तीच नालेसफाईची नाटके, तेच रस्त्यांवरचे खड्डे आणि तोच गेंड्याच्या कातडीहून निर्ढावलेपणा.

एस 19/07/2017 - 10:27
शिवसेनावाले आता त्या आरजे मलिष्काच्या मागे हात धुवून लागले आहेत असे दिसतेय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिच्या घरी म्हणे डेंग्यूच्या अळ्या सापडल्या! आत्ताच बऱ्या सापडल्या?

कंजूस 19/07/2017 - 13:47
दुसय्रांची व्यंगचित्रे काढतात त्यांना स्वत:ची व्यंगचित्रे का आवडत नाहीत? चक्क भडकतात. विरोधी मतही खपत नाही. जहांगिरच्या फोटो प्रदर्शनात पाहिलं आहे .

उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

झाली...पहाट झाली!

सत्यजित... ·
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली! फांदीवरुन कानी येतात सूर काही मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली! गेला चुकून ताफा येथून राजशाही इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!

ये,बैस ना जराशी...

सत्यजित... ·

In reply to by प्राची अश्विनी

सत्यजित... 07/07/2017 - 23:16
आपण लिहितो ते भावत असल्याचं रसिक अवर्जून कळवतात,शाबासकी/शुभेच्छा देतात,ही कुठल्याही कवी/लेखकासाठी एक विलक्षण समाधानाची,आनंदाची बाब आहे! आपली लेखणी,रसिकांशी कुठेतरी relate होवू शकते,त्यांना ती आपलीशी वाटते,ही जाणिवच तिला सतत चालते ठेवते! प्रतिसादाबद्दल अनेक आभार!

सौन्दर्य 08/07/2017 - 09:28
शेवटच्या दोन ओळी एकदम खास. गझल फार छान लिहिली आहे. एक शंका, 'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?

In reply to by सौन्दर्य

सत्यजित... 09/07/2017 - 00:40
>>>'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?>>>अगदी बरोबर सौन्दर्यजी! भट साहेबांनी सुद्धा हा शब्द वापरलेला आहे...'सूर्य येणारे मला कवळून गेले!' अवांतर—या सुंदर गझलेची आठवण झाली,म्हणून मतला देतो आहे... 'कोण जाणे कोण हे जवळून गेले! चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!!'

In reply to by सत्यजित...

रुपी 10/07/2017 - 02:41
मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा शेरही सुंदर आहे.. फक्त दोन्ही ओळींत 'अरश्यात' शब्द वापरण्याऐवजी आणखी काही सुचते का पाहा. (मला गझल, कवितेतलं फार काही कळत नाही. सहज सुचवलं). स्वल्पविरामानंतर एक 'स्पेस' द्या :)

राघव 10/07/2017 - 16:35
सगळेच शेर छान. स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! या ओळी खास आवडल्यात. पुलेशु. :-)

मारवा 13/07/2017 - 09:07
"आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!" या ओळीवरुन हा शेर आठवला किसने भिगे हुए बालोसे ये झटका पानी झुम के आयी घटा टुटके बरसा पानी छतावरील वा बाल्कनीतील प्रेयसी न्हाउनिया केस ओले वाळवणारी प्रेयसी या थीम्स फारच रोमॅंटीक आहेत नेहमी आवडतात

ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य...

दमामि ·

दशानन 01/07/2017 - 21:47
वाह! तत्कालिक विषय घेऊन, त्यावर असे दर्जेदार लिहणे साधी गोष्ट नाही! सर्व शेर आवडले, खरं तर वाघ असते तरी आवडले असतेच म्हणा ;)

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य काही म्हणा पण ऐट तिची भाळण्यायोग्य.. चाटते ती ज्या अदेने मान वेळावून शेपटी चवरीच भासे ढाळण्यायोग्य. बिल्ली असे भारी बिलंदर, अर्धोन्मिलित नयनी टाकते तिरपे कटाक्ष जाळण्यायोग्य. रे किती पिल्ले निघाली एकापुढे एक या विणीला अंत नाही, भंजाळण्यायोग्य. विषय 'मनी'चा म्हणून विणली माळ शेरांची जाणतो मी, मुळीच नाही माळण्यायोग्य. प्रेरणा- अर्थात श्री गुरुजी आणि नवीन सदस्य.

अण्णारती- विरहखंड भाग १

माम्लेदारचा पन्खा ·

In reply to by अभ्या..

समझनेवाले को इशारा काफी है राज की बात कह दू तो जाने मेह्फिल मे फिर क्या हो? संगीतकार लक्श्मीकान्त प्यारेलाल की जोडी सलामत रहे

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) अण्णा द्न्यानी सत्पुरुष, ज्यांचा तीकंपुने केला छळ थोर। जैसा झाला द्न्यानेश्वरमाउलीचा म्हणोनी संन्याशाचा पोर।। अण्णांचा संपवोनिया प्रथमावतार, नाचती कळीचे नारद। अण्णा चमत्कारी मोठे, पुन:अवतारात करती त्यांना गारद।। इतिश्री अण्णापुराणम बिगीनम। कॅप्टन जॅक स्पॅरो (उपाध्यक्ष: अण्णा पुनर्वसन समिती)

येई हो अण्णा रे माझे माऊली ये । कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।। आलिया गेलिया कोणी धाडी निरोप । कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।। काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला । घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।। अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी । अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।

( ते पहा पब्लिक हसंल )

माम्लेदारचा पन्खा ·
पेर्णा सांगायलाच हवी का ? ती पहा पडली विडंबने ती,पैजा लागल्यासारखी खाजही यावी कुठे ,ते न दाखवण्यासारखी!? नवकवी असलास जरी,तू नको काही लिहू... मिपाकरांची खिल्ली करेल मेल्याहून मेल्यासारखी! कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी ! हो!जरा साशंक हो तू,कविता विडंबताच मी पब्लिक जल्लोष करते,दाद दिल्यासारखी! काय तू लिहिले जरासे . . मिपाकर वेडावले लागले मागेच तुझ्या समस्त गाजरपारखी ! —आडमापीगीत

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

कधीतरी.....

पराग देशमुख ·
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद