झोप येईनाच आज
झोप हवी असताना
जांभयाच्या येती लाटा
वर तारे मोजताना
काय आणून वहावे
निद्रादेवीच्या चरणी
झोप येऊन निवांत
उद्या उजाडेल झणी
किती थकून भागून
देह दिला पसरून
डोळ्यात बाहुल्यांना
काय दिसते अजून?
दिसे कालचा प्रकाश
अन्, तम भेसूर उद्याचे
त्यांच्या मध्ये भांबावले
पाऊल हळव्या झोपेचे
एक मायेचा, माथ्याला
हवा सांगणारा हात
सोड उद्यावर, नीज
खूप झाली आहे रात
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9947
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
बैलाचे शेण हे शीर्षक शोभून
बैलाचे शेण हे शीर्षक शोभून दिसेल =))))
"मोबाईल बंद नसतांना" हे
"मोबाईल बंद नसतांना" हे शिर्षक ठेवा.
"आई""माय" हे शीर्षक शोभेल
"आई""माय" हे शीर्षक शोभेल बहुदा. भापो. होतं असं कधी कधी!रतीबाच्या कविता
रतीबाच्या कविता ?????
हा...हा...
In reply to रतीबाच्या कविता by नि३सोलपुरकर
विशेष काय प्रेरणा नव्हती म्हणून आणि लिटरली झोप येत नव्हती म्हणून खरडली कविता...म्हणून रतीबाची म्हटलं.
सं - दी - प
फिकर नॉट ... हे दिवसही जातील
"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत
पैजारबुवा,
आवडली
म्हणून म्हणतो.......
जीव आहे तोवर जगून घ्या
डोळे आहेत तोवर बघून घ्या
काय माहिती.......
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल
म्हणून म्हणतो
चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय
राती अर्ध्या राती जागं रहायच नाय
परतिसाद आवाल्डा
In reply to आवडली by कर्नलतपस्वी
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल.... हे भारीच!
सं - दी - प
आवडली
कविता.
अशी अवस्था अनुभवताना जवळपास असेच विचार येतात.
दिसे कालचा प्रकाश
कविता आवडली. विशेषतः वरील कडवे!
छान आवडली रचना. आधी अस्वस्थता
छान आवडली रचना. आधी अस्वस्थता आणि आर्त अपेक्षा !
+१
"हवा सांगणारा हात" हे शिर्षक कसे वाटते ?
एकदम सुरेख रचना.
एकदम सुरेख रचना.
एक मायेचा माथ्याला, मायेचा
एक मायेचा माथ्याला,मायेचा हात माहिती होता,हे नवीन छान वाटले.सगळं नीट होईल, शीर्षक :)
एक मायेचा माथ्याला, मायेचा
In reply to एक मायेचा माथ्याला, मायेचा by Bhakti
आवडली.... छान लिहिलीत
कवितेच्या प्रसव वेदना
कशी येईल झोप सदना |
पोस्ट ली कविता मिसळपाव
चला आता येईल झोपेचा गाव |
आता स्वप्नांचा डाव मांडणे..
मालवा हो (सं )दीप चांदणे ||
हा हा ... भारीच बाजीगर सर.
In reply to आवडली.... छान लिहिलीत by बाजीगर
हा हा ... भारीच बाजीगर सर.
मूळ कवितेबरोबर हे देखील आवडलं.
मालवा हो (सं )दीप चांदणे - हे खासंच.
धन्यवाद चामुंडाराय जी
In reply to हा हा ... भारीच बाजीगर सर. by चामुंडराय
धन्यवाद चामुंडाराय जी.
आधीच सं - दीप आहे
In reply to हा हा ... भारीच बाजीगर सर. by चामुंडराय
मालवून कसं चालेल!
सं - दी - प
मस्त हो मस्त !
In reply to आवडली.... छान लिहिलीत by बाजीगर
बाजीगर साहेब, मस्त हो मस्त !
🤝
शीसु नसून शीसुना आहे.
'शीर्षक सुचवा' असे शीर्षक नसून 'शीर्षक सुचले
नाही' असे आहे.
बाकी कविता आवडली.
'शीर्षक सुचवा' असे शीर्षक नसून
In reply to शीसु नसून शीसुना आहे. by चित्रगुप्त
सही पकडें हैं!
बरोबर , पण ........
In reply to शीसु नसून शीसुना आहे. by चित्रगुप्त
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !
आजकाल रात्री झोपताना मोबल्या नेटाने नीट नंद ... स्वारी ... बंद
छान
आजकाल रात्री झोपताना मोबल्या नेटाने नीट नंद ... स्वारी ... बंद करावा लागतो झोप येण्यासाठी !!
कविता आवडली
कविता आवडली बाकी नावांत काय आहे
हेही ठीकच!
In reply to कविता आवडली by मित्रहो
शेक्सपियर का कोणतरी हेच्च सेम म्हटलाय बहुतेक.
सं - दी - प
वाह!
वाह!