Skip to main content

करोना

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/02/2022 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.

{आरती कोव्हिडची}

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/12/2021 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8 ________________________________________________________________________ आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस । विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥ पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी। चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी । आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*। ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥ लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*। मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या। घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही

कावळा आणि लॉक डाऊन

लेखक अनिकेत कवठेकर यांनी मंगळवार, 29/06/2021 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
दाटून आलेलं आभाळ पण पाऊस पडत नव्हता उडू की नको या विवंचनेत पडलेला एक अर्धा भिजलेला कावळा कसा बसा, शहारत, तोल सावरत गर्द आकाशाकडे बघत चारी दिशांना काय शोधत होता कुणास ठावूक नक्की काय करावं या विवंचनेत त्याचा चेहरा बहुधा अधिकच काळवंडलेला शेजारच्या कावळीच्या जास्त जवळ जावं तर सोशल डिस्टंसिंग आड येणार अंतर पाळावं तर शेजारच्या बिल्डिंग वरचा कॉम्पिटिटर टपूनच बसलेला अंधारे क्षितिज लंघून पलीकडे जावं तर ..पलिकडे नक्की काय आहे, .. मित्र आहेत की शत्रू की इथल्यासारखंच तिथे ..जाताना वीज तर पडणार नाही ना .. भिजलेले पंख किती काळ फडफडू शकणार आपण आणि गेल्या कित्येक दिवसांचा ..
काव्यरस

कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/07/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल तरीही प्रश्न शिल्लक रहातो सगळे नोकर चाकर व्यवस्था असून कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ? प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ? केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? . . . . . . * अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्

हो मनुजा उदार तू ..

लेखक मनोज यांनी शुक्रवार, 01/05/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाने सूक्ष्म हे दैत्य असे सोडले अहंकारी माणसा गर्व सारे तोडले धूर हा हवेत रोज नदीत जहर सांडले प्रतिशोध हा असेल तुला घरात कोंडले उपसलेस बहुत तेल गिरी अनेक फोडले सजेल ही धरा पुन्हा तव हस्तक्षेप खोडले विकास नाव देऊनी वृक्ष अमाप छाटले दुःख ते अपार किती वसुंधरेस वाटले ? मोडलेस घर त्यांचे नांगर थेट फिरवले झुंजलेत पशु त्यांना हिंसक तूच ठरविले शिक आता दिला धडा जरा तरी सुधार तू देई स्वार्थ सोडुनी हो मनुजा उदार तू
Taxonomy upgrade extras