मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाचणीचे लाडू

manguu@mail.com ·
नाचणीचे लाडू साहित्य - नाचणीचे पीठ अर्धी वाटी ओले खोबरे किसुन २ चमचे शेंगदाण्याचा कूट ४ चमचे गूळ गरजे नुसार नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची. मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल. वेलची, ड्राय फ्रूट , तीळ , भाजलेली मेथीदाणे एखादा चमचा , खजूर इ इ इ अ‍ॅड करता येईल. नाचणीच्या पिठाच्या लाडवाच्या अनेक पद्धती दिसतात. पीठ भाजणे, त्यात गूळाचा पाक करुन घालणे. गुळाच्या पाकात नाचणी पीठ घालून तव्यावर गोळा करणे .