Skip to main content

प्रेम कविता

शब्दांची कर्णफुले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

उभा मी वाटेवरती

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 09/02/2021 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यांचे काजळ मी आहे मला जरासे तू लावून घे ना तीट म्हणूनी गालावरती फुलबागेमधले मी फूल सुगंधी मला जरासे तू माळून घे ना तुझ्या तिमिरी केसांवरती मी एक गाणे युगल, प्रितीचे मला जरासे तू गाऊन घे ना चांदणवर्षावातल्या राती तुझा मी होईन पदर भिरभिरता मला जरासे तू लपेटून घे ना तुझ्या शहारत्या अंगाभोवती काहीही होतो तुझ्या आवडीचे मला जरासे तू सांगून बघ ना उभा मी तुझ्याच वाटेवरती - संदीप चांदणे

यमकं बिमकं, कविता बिविता..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 30/12/2020 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास , "यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच." मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू? आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही, अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का? समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं? नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं? तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल. कसा हात मागितला?
काव्यरस

बात हुई ही नही

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 25/10/2020 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
पिछली चांद की रात तो बरसी बहुत हम फिरभी अपनी तिश्नगी साथ लिये लौटे अजीब है ये वाक़या, मगर बात हुई ही नही दूर उफ़क की लकीर सुर्ख हो चली थी उनके आमद की खबर गर्म हो चली थी सुनते है वो आये तो थे कायनात पे छाये तो थे हम न जाने किस चांद की याद मे मसरूफ़ थे के बात हुई ही नही जो बात रात रात भर बारीशे करते है इस जमी से शायद आसमा के पैगाम हो इस जमी के नाम जैसे ऐसे ही वो बात जो हमे उनसे करनी थी रातें गुजरी मगर बात हुई ही नही ना चांद रुका ना उफ़क पंछि रुका और ना ही बारीशे रुकि रातें बिती, हा हमपे बिती मगर आखिर बात हुई ही नही |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२४/१०/२०२०) उफ़क = क्षितिज आमद = येण्या

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

आठवण

लेखक Prajakta Sarwade यांनी बुधवार, 23/09/2020 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ -प्राजक्ता

तुझी वाट

लेखक चांदणशेला यांनी गुरुवार, 23/07/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी चोरपावलाने हळूच तू येऊन जा पाखरांचे उदास सूर घेऊन जा जाग्या झाल्या भोवती रानसावल्या आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
काव्यरस

आणि अश्या वेळी

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 26/05/2020 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

चांदणरात

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शनिवार, 09/05/2020 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
पैजणी चांदणरात तुझ्या स्पर्शात हे प्राण घेऊनी आली... स्पर्श संदिग्ध जरासे मंद गुलाब फिरले गाली... ढवळते वारा छेडील्या तारा आकाश असे सचित्र... उधळती रंग पसरले गंध हे भास मला विचित्र... उरी मोगरा प्रसविते झरा तुझी मधुर काया... क्षणाची भूल उठविते झूल निळी सावळी माया... - कौस्तुभ