Skip to main content
लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 13/02/2026 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
जरा आगळे आज वाटते मनी काहीसे आज दाटते करमत नाही हुरहुर काही कुणी सारखे स्वप्नात येते. आज झऱ्याचा नाद वेगळा आज नभाला साज वेगळा वेगळ वाटतं नभातल चांदणं काळजा छेडती कुणाची पैंजण मना कुणीसे आज वेढते. आज उदासी मना भारुनी उरी कुणीसे येई फिरुनी कळेना असे का भिरभिरते मन मनी प्रीत कुणाची फुले क्षणक्षण प्रीत कुणाची मनी उमलते. https://youtu.be/8g_lRY-rduk
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 214
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया