Skip to main content

प्रेम कविता

नको ना रे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2022 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

आली जरी रात सजणी...

लेखक Deepak Pawar यांनी सोमवार, 19/12/2022 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे. हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे. का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का? तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे. डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे. रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे. . . दीपक पवार.
काव्यरस

एक झलक तुझी पाहता...

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 29/11/2022 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते. रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते. रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते. पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.
काव्यरस

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 24/11/2022 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे अंतरात निनादती तव तराणे. बहरलेले झाड तू जे कळ्यांनी बरसलेले मेघ तू जे सरींनी सजविले आहे मना तू फुलाने. रात तू जी भारली चांदण्याने गीत तू जे गायले पाखराने रंगल्याले तूच ते ना या नभाने. तूच दर्या, तू नदी अन् झरा तू चांदणे तू चांद तू अन् धरा तू ल्यायलेले रुप तू या धरेने........

साजणी आता इथे...

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 13/11/2022 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा. माळता केसात सुमने गगन हे गंधाळले गंध केसातील सारा या इथे उधळून जा. एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
काव्यरस

सांजावता दाटते का तुझी आठवण?

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 02/11/2022 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सांजावता दाटते का तुझी आठवण? जीवास या जाळते का तुझी आठवण? होते तुझे गोड ते लाजणे ही होते तुझे गोड ते हासणे ही गेल्या सुखा माळते का तुझी आठवण? वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे पर्णातुनी वाटते नांदती हे गंधापरी वाहते का तुझी आठवण? येती जशी पाऊले चांदण्याची होते कशी काहिली ही मनाची रातीस या भाळते का तुझी आठवण? दीपक पवार.
काव्यरस

अवती भवती तरंगे.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 25/10/2022 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ. रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ. संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे? उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल. छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.

ब्लिडींग हार्ट....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 26/05/2022 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

तू

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/04/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
तू चालते अशी झाडावरची वेल ग अंगावरती पानं फुलं ल्यायते ग तू हसते अशी झरा वाहतो ग खळखळाटानं हासणं पिकतं ग तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग येता येता सुगंघ आणतो ग तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग - पाषाणभेद २९/०४/२०२२
काव्यरस

कळले मला न काही.

लेखक Deepak Pawar यांनी शनिवार, 02/04/2022 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी. कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी सांगून टाक आता जे सलते मनात राणी. येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी. ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.
काव्यरस