मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्य

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

आमचाही पाउस.....

ज्ञानोबाचे पैजार ·
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

मिपासार

माम्लेदारचा पन्खा ·
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….

प्यार हमे किस मोड पें ले आया : विडंबन

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
आमच्या कंपनीच्या यंदाच्या फ़ॅमिली डे निमीत्त एका डान्स साठी ’सत्ते पे सत्ता’ या चित्रपटातील ’प्यार हमे किस मोड पें ले आया’ या गाण्याचे अस्मादिकांनी केलेले विडंबन.. हे गाणं इथे पाहता येइल :) हम ने क्या कोड भेजा जो कहा दीवाना हम को नही कुछ समझ ज़रा समझाना ’चेक इन’ मे जब ’कोड’ कोई फ़ट जाए तब धड़कन और बैचेनी बढ़ती जाए जब कोइ गिनता है रातों को तारे तब समझो कोइ ’इश्यू’ आ गया प्यारे प्यार (P'Iyer) हमे किस मोड़ पे ले आया कि फिल करे हाय

आळी मिळी गुप चिळी!

सटक ·
लेखनविषय:
आळी मिळी गुप चिळी! तू पेटव चिता, त्यावर मी भाजतो पोळी.. आळी मिळी गुप चिळी! तू शोध साधू, त्याना मी देतो सुळी.. आळी मिळी गुप चिळी! तू बनव शत्रू, त्याना मी देतो हाळी.. आळी मिळी गुप चिळी! तू लागल्यासारखे कर, मी ठोकतो आरोळी.. आळी मिळी गुप चिळी! अर्धे शतक माझे आता आली तुझी खेळी.. आळी मिळी गुप चिळी! मी नागवलेच आहे, आता तू फेडशील ती वेगळी..

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

कविता - हापूस

वेल्लाभट ·
लेखनविषय:
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात.

नेता व्हायचंय एका रात्रीत ?

संजुदा ·
लेखनविषय:
काव्यरस
नेता व्हायचंय एका रात्रीत ? पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या समाजसेवेनंतर नेते तयार होत असत. आता जमाना बदललाय. जीवन गतिमान झालंय. डिजिटल युग आलंय. आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत. तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे. नेता व्हायचंय एका रात्रीत ? दाखवून टाक झलक चौकाचौकात लाव पोरा शुभेच्छांचे फलक घरादारात गल्लीबोळात जरी नसेल तुला स्थान फलकावरती लिहून टाक युवकांचे आशास्थान वडील नेहमीच ओरडत असतात दाखव काही तरी कर्तृत्व हरकत काय रे लिहायला शहराचं खंबीर नेतृत्व ? वाढेल वलय नेतृत्वाचे मिळेल तिथे खाता खाता होऊन जाशील बेट्या एक दिवस

पप्पू माझा लेकुरवाळा

लॉर्ड फॉकलन्ड ·
लेखनविषय:
'विठू माझा लेकुरवाळा' या गीताच्या चालीत खालील गीत सावकाश गुणगुणावे. _____________________________________________________ पप्पू माझा लेकुरवाळा संगे खांग्रेसींचा मेळा दिग्गीराजा खांद्यावरी खुर्शिदाचा हात धरी पुढे चाले राज बब्बर मागे नगमा ही सुंदर कपिल आहे मांडीवरी अंबिका, गिरीजा बरोबरी अहमद आहे कडेवरी शीला करांगुली धरी रे़णुका म्हणे राहुला करी खांग्रेसीं‍चा सोहळा

कुक्कुट शर्विलक-विलाप

चलत मुसाफिर ·
लेखनविषय:
काव्यरस
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.) मालवणातिल सागरलहरी मला खिजविती अष्टौप्रहरी बाण लागता नको तिथे हा पर झाली 'कनका'ची नगरी 'कुक्कुट गेले साथ सोडुनी 'विकास' दिसता दुज्या अंगणी चोचीमधला दाणा जपती नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी 'वाघ' लागला मागावरती 'वांदरे'हि किलकारा करती वनवासातुन सुटका या हो कधी व्हायची? घटिका सरती.. 'सोनिया'सम ते दिन ना उरले 'घड्याळा'तलेही क्षण सरले ठेवावे हे मस्तक ऐसी दिसतिल का चरणांची 'कमले'?