Skip to main content

हास्य

(कश्या कश्याला मुकलो ते...)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 21/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो.. समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन. हाती पाण्याने भरलेला डबा. आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते.. माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते...
काव्यरस

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 07/02/2014 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या तळटीप : नमस्कार हे उघड्या पुन्हा जहाल्या या उमाकांत काणेकर लिखीत गीताचे विडंबन आहे. हे विडबंन सुचण्यासाठी पळसाला पाने तीनच या मि.पा.
काव्यरस

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 20/01/2014 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

लेखक शुचि यांनी रविवार, 12/01/2014 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात बेलिंडा रहात असे सुखात आनंदात तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा . मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़ त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड . कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार अंगावरती खवले त्याची नखे धारदार मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे . बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळवित पार मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी . बेलिंडा कस्ट
काव्यरस

घन टमी..

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 10/01/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने हे विडंबन सुचले.संदर्भासाठी,खाली,भा.रा.तांबे यांची मूळ कविता देत आहे. घन टमी,पँट बघ घट्ट करी रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी ये बाहेरी व्यायाम करुनी शुद्ध मोकळ्या हवेत का बसशी,कोचातच रुतुनी रे! मार बैठका जोर तरी जड झाले, अति गोड खादले स्नायु नुरे,बेढब तनु डुले मेद जमे,बघ पोटही सुटले का मरणाशी खेळ चाले मना,वृथा का भीशी जगण्या दार सुखाचे ते निसर्ग भ्रमणा वसुंधरा पाहे वाट मना पसरोनी शेला हिरवा परी मूळ कविता:- घन तमीं शुक्र बघ राज्य करी रे खिन्‍न मना,बघ जरा तरी !
काव्यरस

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 01/01/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंग
काव्यरस

कविता : घरची मैफल !!

लेखक बाळअमोघ यांनी बुधवार, 11/12/2013 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरची मैफल !! मैफल झाली गंधर्वांची अहा काय ते गाणे झाले सूर अजूनही संगीताचे कानी माझ्या भरून राहीले रात्रीच्या त्या दुसऱ्या प्रहरी असा कसा मी असतो गाफील कसे पामरा ठाव असावे सुरू व्हायची घरची मैफल खिसा रिकामा, किल्ली विसरलो आठवतो कालचाच तंटा अन दारावरती वाजवतो मी मैफलीची ही तिसरी घंटा जरा कुठे मज झोप लागली वेंधळ्याची ही जात कशी दारामागून शिव्या देऊनी सुरवातीची नांदी अशी संताप राग हा तार सप्तकी ताल तिखट अतिद्रुत ती लय पाहुनिया आवेश हिचा मज वाटू लागे भलते भय संथ आलापी रुसव्याची ती नंतर ताना कडकड कडकड दमदाटीचे घेऊन तीय्ये बोलतानी तर अशक्य बडबड रौद्र भयाची
काव्यरस

तू आलीस त्याला सोडून

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 12/11/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन. प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच!
काव्यरस

तेंव्हा आणि आता ...

लेखक माशा यांनी शुक्रवार, 25/10/2013 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा नुसती अश्शी भिरभिरायची नजर आता बाजूला माझ्यावरच तिरकी नजर ! मनात येताच मित्र जमून करायचो कल्ला 'विचारून' बाहेर जाताना आता ऐकतो सल्ला ! तेंव्हा चापायचो हॉटेलात जाऊन चिकन हंडी आता आवडून घेतो सात्विक मुगाची खिचडी ! तेंव्हा कशी वेगात बुंगाटत होतो बाईक आता 'मागून येणा-या' सूचनेचा पाईक ! तेंव्हा कधी बाळगली नाही तमा आयुष्याची आता जाणवते जबाबदारी तुझ्याही आयुष्याची ! - माशा
काव्यरस