मिपासार
काव्यरस
(मिपावर)
जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !)
जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …)
जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! )
तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ?
तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ?
तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ?
तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता…. भले शाब्बास )
तुम्ही जे काही स्कोर सेटल केलेत तेही इथेच केलेत ! (कशी जिरवली !!!)
तुमची मिपावर असताना आज जशी अवस्था आहे…( संदिग्ध, भ्रमिष्ट,नादिष्ट,छांदिष्ट वगैरे वगैरे )
तशीच काल दुसर्या कोणाचीतरी होती…. आणि तशीच उद्या नवीन मेम्ब्रांची असेल…
चिखलात असूनही कमळासारखे राहणे हा मिपाकरांचा नियम आहे !!
वाचन
6832
प्रतिक्रिया
0