गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले.
सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत.
त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील.