सनकी भाग ७
काया ऑफिस मध्ये गेली तिने फेंट गुलाबी कलरचा शॉर्ट असा वनपीस घातला होता. तो ड्रेस तिला खुलून दिसत होता. ती कॅबिनमध्ये जाऊन बसली ना बसली तो पर्यंत इंटरकॉम फोन वाजला तिने जरा वैतागुणच तो उचलला. रिसेप्शनिस्टने सांगीतले की रिचा सरनाईक मिटिंगसाठी आलेत मॅडम. कायाने तिला पाठव असे सांगीतले. रिचा नॉक करून कायाच्या कॅबिनमध्ये गेली.काया रिचाला नखशिखांत न्याहाळत होती. रिचाने स्काय ब्लू कलरचा शर्ट व नेव्ही ब्लु कलरचा मिनी स्कर्ट घातला होता. तिचे गोरे पाय अगदी उठून दिसत होते. लांब सडक केस गालावर रूळत होते. तिने केलेला लाईट मेकअप तिचा चेहरा आणखिनच खुलवत होता.