सनकी भाग ५

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
15 Jan 2020 - 10:16 am

दुसऱ्या दिवशी परत शिवीन काया फॅशन हाऊसमध्ये गेला. जानं त्याला भागच होत कारण हे एकच प्रोजेक्ट त्याला फाईनान्सशियल क्रायसेस मधून बाहेर काढू शकत होते. पण आज ही चार तास बसून काया त्याला भेटली नव्हती. तो चांगलाच भडकला व रिसेप्शनिस्टला बोलू लागला.

शिवीन, “ what the hell is that? आज तर तुमच्या मॅम भेटणार आहेत का मला? नाही तर मला Mr मानेंशी बोलावं लागेल.”

रिसेप्शनिस्ट ,“ प्लीज सर तुम्ही बसून घ्या; मी मॅमना फोन करते. सध्या त्या मिटिंगमध्ये आहेत. ”अस म्हणून तिने इंटरकॉमवर फोन केला व शिवीन आल्याची माहिती दिली.

शिवीन वाट पाहत होता. दोन तास होऊन गेले तरी अजून काहीच रिस्पॉन्स नाही. शिवीनचा पारा चढला. सरळच कायाच्या कॅबिनमध्ये घुसला. त्याला ऑफिस बॉयने अडवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाला ही न जुमानता सरळ कायाच्या समोर जाऊन उभा राहिला. काया लॅपटॉपवर काही तरी काम करत होती.शिवीनला असे अचानक समोर पाहून ती गांगरून उभी राहिली दोन मिनिटं त्याला पाहत राहिली व मग सावरून बोलू लागली.

काया ,“ how dare you do like that? Who are you? रमाकांत कोण आहे हा आणि माझ्या कॅबिन मध्ये कसा आला ” ती मोठ्याने ओरडत होती.ओळखून ही न ओळखल्याचा आव आणत होती.

शिवीन ,“ who I am? मिस काया जयसिंग ;मी शिवीन ठाकूर ज्याला तुम्ही दोन दिवसा पासून मिटिंगला बोलावताय व भेटत नाही आहात.” शिवीन तणतणत होता.

काया, “ हो का? पण दोन दिवस झाले मी बिझी आहे म्हणून नाही भेटू शकले तुम्हाला; म्हणून तुम्ही सरळ माझ्या कॅबिनमध्ये घुसणार का?” ती जरा घमेंडीतच ;डोळ्यात तुच्छतेचे भाव आणत बोलली.

तिचं बोलणं एकूण शिवीन ही चांगलाच भडकला व म्हणाला.

शिवीन,“ मिस काया मला ही हौस नव्हती असं तुमच्या कॅबिनमध्ये येण्याची पण यावं लागलं मला आणि बिझी तुम्ही आहात तर मी ही रिकामा नाही एकूण तुम्हाला माझ्या बरोबर या प्रोजेक्ट मध्ये काम करायचं नाही असं दिसतंय ;तर मला ही तुमच्या बरोबर काम नाही करायचं मी तसं मिस्टर मानेंला कळवतो. I am also not interested to do this project with you. good by!” अस म्हणून शिवीन कॅबिनच्या बाहेर निघाला.

कायाच्या हे लक्षात आलं की आपण खूपच ताणले कारण गळाला लागलेला मासा निसटू पाहत होता. बरं कायाला वाटलं होतं की शिवीन आपल्याला ओळख दाखवेल पण तो तर तिच्याशी अनोळखी असल्या सारखा बोलत होता. काही ही करून शिवीनला तिला थांबवायचे होते पण तिला गरज आहे किंवा ती थांबवते अस न दाखवता म्हणून तिने सुधीरला फोन करून शिवीनच्या मागे पाठवले.सुधीर शिवीनच्या मागे गेला.सुधीरने त्याला अडवले व म्हणाला.

सुधीर ,“ प्लीज सर जरा माझं ऐका मॅम खरंच दोन दिवस झालं बिझी होत्या काल त्यांच्या आईची तब्बेत ठीक नव्हती म्हणून त्या नाही येऊ शकल्या ऑफिसला त्या त्याच टेन्शनमध्ये आहेत तुम्ही इतक्या छोट्या कारणा वरून इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर पाणी सोडणार आहात का? आणि तुमच्या वडीलांना काय उत्तर देणार?” सुधीरने सोडलेला बाण बरोबर वर्मी लागला व वडीलांचे नाव ऐकताच शिवीन थांबला.

सुधीरला चांगलं माहिती होत की शिवीनला या प्रोजेक्टची किती गरज आहे ते; त्यामुळे शिवीन हा प्रोजेक्ट सहजा-सहजी सोडणार नव्हता. शिवीन वडीलांचे नाव ऐकताच भानावर आला व रागाच्या भरात आपण चूक करत आहोत हे त्याच्या लक्षात आले कारण हे एकच प्रोजेक्ट त्याचा बिजनेस सावरू शकणारे होते. त्याच्या सगळ्या आर्थिक विवंचना दूर करणार होते व त्याचे फॅशन हाऊस पुन्हा नवीन उभारी देणार होते. तो जरा शांत झाला व सुधीरला म्हणाला.

शिवीन, “ ठीक आहे पण आज मिटिंग व्हायला हवी.”

सुधीर,“ हो चला सर” अस म्हणून ते दोघे कायाच्या कॅबिनकडे निघले. काया तिच्या लॅपटॉपवर हे सगळं पाहत होती व हरलेला डाव जिंकल्याच हास्य तिच्या चेहर्‍यावर विलसित होत.

पण शिवीन कोळ्याने विणलेल्या जाळ्यात अलगत शिकार अडकावी तसा अडकत होता.याची त्याला पुसटशी ही कल्पना नव्हती.

●●●●

सुधीर आणि शिवीन कायाच्या केबिनमध्ये गेले. काया व शिवीनमध्ये जुजबी बोलणे झाले. काया आता मुद्द्यावर आली. तिने शिवीनच्या समोर लीगल काँट्रॅक्ट पेपर ठेवले.शिवीन ते काँट्रॅक्ट पेपर वाचत होता. तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. काया त्यालाच भान हरपून एक टक पाहत होती. पण शिवीन ते पेपर वाचण्यात गुंग होता. त्याची नाराजी चेहऱ्यावर साफ झळकत होती. त्याने पेपर वाचले व तो नाराजीच्या सुरातच बोलला.

शिवीन, “हे काँट्रॅक्ट मला मान्य नाही कारण यातील काही अटी मला मान्य नाहीत.

अशा कोणत्या अटी कायाने कँट्राक्ट मध्ये होत्या ज्या शिवीनला मान्य नव्हत्या.

क्रमशः

कथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jan 2020 - 10:53 am | ज्ञानोबाचे पैजार

पाचही भाग वाचले, भागागणिक कथानक मनोरंजक होते आहे.
पुभाप्र,
पैजारबुवा,

शब्दांगी's picture

15 Jan 2020 - 11:06 am | शब्दांगी

पैजारबुवा,
धन्यवाद,पुढील भाग लवकरच

श्वेता२४'s picture

15 Jan 2020 - 11:11 am | श्वेता२४

उत्कंठावर्धक लिखाण आहे. पण भाग थोडे छोटे होत आहेत त्यामुळे रसभंग होतोय. जरा मोठे मोठे भाग टाकले तर वाचायला मजा येईल. पु.भा.प्र.

शब्दांगी's picture

15 Jan 2020 - 12:18 pm | शब्दांगी

श्वेता२४
धन्यवाद, पुढचे भाग मोठे अपलोड करण्याचा प्रयत्न नक्की करेन