लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 26/05/2024 09:19 या दिवशी प्रकाशित केले. तप्त तडिताघाताची दीर्घ मेघगर्जनेची मत्त सागरगाजेची जातकुळी एक ना? मोरपिसाच्या डोळ्याची खोल पाणभोवर्याची गूढ कृष्णविवराची जातकुळी एक ना? अगणित अभ्रिकांची शतकोटी शक्यतांची अनंताच्या उद्गमाची आदिमाय एक ना? लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 694 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया