परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
२२ मे २०२४
आज ध्यानाचा तिसरा दिवस.
आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात!
आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच !
ध्यानगृहातुन दिसणारा नजारा : (इथे समोर जे छत दिसत आहे त्या इमारतीचे नाव होते रामकुटीर. सर्वात अफलातुन व्यु होता त्या तिथुन, पण मला तिथे रहायचा योग आला नाही.