( वरपरीक्षा )

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
31 Mar 2017 - 11:54 pm

आमची प्रेरणा

वरपरीक्षा
...........................
नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो
कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो
*
होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो
वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो
*
अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो
बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो
*
बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त
सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त
*
आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे
येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे
*
येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे
वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे
*
नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
नागीण बीन वाजवता, गारुड्याने का डुलावे?

धोरणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयमुक्तकविडंबनशब्दक्रीडासमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजाmango curryअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीइशाराकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडछावाजिलबीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीसांत्वनाहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरस

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 12:03 am | श्रीगुरुजी

जबरदस्त विडंबन!!!!

रातराणी's picture

1 Apr 2017 - 12:10 am | रातराणी

=)) धन्यवाद!

अर्रर्रर्रर्र! लईच भन्नाट!

रातराणी's picture

1 Apr 2017 - 12:26 am | रातराणी

=)) धन्यवाद

राघवेंद्र's picture

1 Apr 2017 - 12:50 am | राघवेंद्र

मस्तच !!!

एकदम इन्स्टंट विडंबन :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2017 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ही!

माहितगार's picture

1 Apr 2017 - 12:29 pm | माहितगार

नागीण बीन वाजवता, गारुड्याने का डुलावे?

=))

गामा पैलवान's picture

1 Apr 2017 - 12:40 pm | गामा पैलवान

पाऊलखुणा आवडल्या.
-गा.पै.

ओ's picture

1 Apr 2017 - 12:43 pm |

छान

विअर्ड विक्स's picture

1 Apr 2017 - 1:10 pm | विअर्ड विक्स

मस्त आहे.. एकसौ एक पंच आहेत _/\_

अविनाशकुलकर्णी's picture

1 Apr 2017 - 1:56 pm | अविनाशकुलकर्णी

विडंबन आवडले ..........अकुकाका

अभ्या..'s picture

1 Apr 2017 - 1:57 pm | अभ्या..

भारीच.
अकुकाकांना आवडले मग तर लैच भारी.

नीलमोहर's picture

1 Apr 2017 - 3:30 pm | नीलमोहर

आली गो बाय माझी ती,
किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

रातराणी's picture

3 Apr 2017 - 5:14 pm | रातराणी

Sarvana Dhanyvaad!