मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( वरपरीक्षा )

रातराणी · · जे न देखे रवी...
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे? नागीण बीन वाजवता, गारुड्याने का डुलावे?

वाचन 9291 प्रतिक्रिया 0