पैसोबा पुराण

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
29 Apr 2015 - 11:01 am

माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण-
माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने!
पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्‍या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने!
पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!

अर्थकारणअर्थव्यवहारविचार

प्रतिक्रिया

निमिष्काका, शीर्षक पटलं नाही! पुराण कुठाय?

थोपुवरून उचलून डायरेक टाकलंत ?

आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!

हे मिपावर कसं काय करता येतं ?

निमिष सोनार's picture

29 Apr 2015 - 12:17 pm | निमिष सोनार

थोपू?

भुमन्यु's picture

29 Apr 2015 - 2:01 pm | भुमन्यु

फेस = चेहरा/थोबाड
बुक चेपु/थोपु
फेसबुक = चेपु/थोपु

रुस्तम's picture

29 Apr 2015 - 4:06 pm | रुस्तम

पु पुस्तक
चेहरा / थोबाड पुस्तक

हे मी स्वत:च लिहिलं आहे

काय? बरोबर ना?

खेडूत's picture

29 Apr 2015 - 12:11 pm | खेडूत

त्ये कळतंय हो !
पण मध्यम बदलताना काई संस्कार करायचे कष्ट घ्याल कि नाई?

आमी उठसूट कायबी शेर करत नसतो!

बाकी लेख प्रचंड आवडला हे सांगायचं ऱ्हायलं …

स्पंदना's picture

29 Apr 2015 - 11:48 am | स्पंदना

पाच पैसे कुठे आहेत?

पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण?
कोल्हापुरला या. पैसा'पुराण ऐकवतील.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 11:57 am | टवाळ कार्टा

:)

पैसा's picture

29 Apr 2015 - 12:01 pm | पैसा

वाती आणा वळायला.

यसवायजी's picture

29 Apr 2015 - 12:09 pm | यसवायजी

:))
येतोच मग. रावसाब, अन्या माझं नाव घाला रे तांबडा-पांढर्‍याच्या लिष्टीत.

नाखु's picture

29 Apr 2015 - 12:28 pm | नाखु

वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे (२५च्या) जोड्या करून सत्काराला पाहीजेत.

परस्पर भागवत
चिटणीस

मि.मा.मि.मं. सचालित ल.हा.धा.स. तर्फे

यसवायजी's picture

29 Apr 2015 - 12:49 pm | यसवायजी

@ वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे >>
जेप्याला अजुन कुठे दिवे लावायला सांगताय? पुरे झालेत आधीचेच. :))

पैसा's picture

29 Apr 2015 - 12:28 pm | पैसा

कोल्लापूरला यायला ट्रक बिक पायजे का? अन्या दातारला त्वरित संपर्क करा.

यसवायजी's picture

29 Apr 2015 - 12:35 pm | यसवायजी

आपणा सर्वांची व्यवस्था 'बघायला' आम्ही केयस्सारटीशीच्या बशीने आदले दिवशीच निपाणीत दाखल झालेले असू. पुराण तेवढं जंक्शान होऊद्या. ;)

(धाग्याची 'वात' लागते वाततं)

पैसा's picture

29 Apr 2015 - 12:41 pm | पैसा

पुराणाची कल्जीच नको! कापूस त्येवडा भरपूर आणा म्हणजे झालं. मग धाग्याची वात नाय लागायची.

बेळगाव निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पैजे वगैरे फ्लेक्क्ष तयार केलेत का नाय?

यसवायजी's picture

29 Apr 2015 - 12:56 pm | यसवायजी

"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा-निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र" असा फ्लेक्क्ष करायची ऑर्डर सोलापुरकरांना दिल्ये. खाली "सुप्रशिद्ध पैसापुराण- आग्रहाचे आमंत्रण. तिकीटविक्री चालू." अशी अ‍ॅडपण हाय. बर्री निवू.

पैसा's picture

29 Apr 2015 - 1:03 pm | पैसा

माझ्या नावावर पयशे गोळा करायला चालू? चन्नागिदे!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा

@ कोल्हापुरला या. पैसा'पुराण ऐकवतील.>> :-D अगदी अगदी! :-D

मला वाटले पैसा तैचे "अहो" पण आले काय मिपावर

पैसा's picture

29 Apr 2015 - 12:02 pm | पैसा

त्याला काय कामं नाहीत काय

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 12:12 pm | अत्रुप्त आत्मा

:-D :-D :-D

एस's picture

29 Apr 2015 - 12:10 pm | एस

शीर्षक वाचून मलापण अगदी असेच वाटले.

अजया's picture

29 Apr 2015 - 12:15 pm | अजया

=))मलाही !!

मोहनराव's picture

29 Apr 2015 - 3:22 pm | मोहनराव

:)

सुबोध खरे's picture

29 Apr 2015 - 12:17 pm | सुबोध खरे

एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात.
हि प्रवृत्ती जवळ जवळ सर्व माणसात असते. याचे कारण बर्याच वेळेस ती वस्तू महाग मिळते म्हणून नव्हे तर मला ती स्वस्तात कशी मिळाली हे लोकांना दाखवण्यासाठी. ( म्हणजे मी किती व्यवहार चतुर आहे हे दाखवण्यासाठी).
यात उच्छाद म्हणजे बायका त्या आपल्याला हि वस्तू कितीला मिळाली हे विचारतात. म्हणजे किंमत जास्त सांगितली कि त्यांना आनंद होतो. मला म्हणून स्वस्त दिली, एकच नग होता इ इ. ( मी किती गृहकृत्यदक्ष आहे हे दाखवता येते)
बाकी आपण आय फोन ६ का घेतला किंवा बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच ते म्हणजे आपण कसे वेल प्लेस्ड आहोत किंवा आपलि अभिरुची कशी उच्च आहे हे दाखवणे याचा नमुना.
गेला बाजार --मी सवाई गंधर्व मध्ये फक्त भीमसेन ऐकतो. बाकी गंगुबाई हनगल फिरोज दस्तूर वगैरे "ठीक" आहेत म्हणणारे पण बरेच दिसत असत.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 12:28 pm | टवाळ कार्टा

बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच

यावर मी एक धागा टाकणार आहे...आधीच कॉपिराईट करुन ठेवलाय हा विषय इथे :)

तुला भलतंच कॉपीराईटाचं वेड रे ?
उद्या टाकलेल्या पिंका पण कॉपीराईट करत बसशील..

मी म्हैसोबा पुराण अस वाचल..

नाखु's picture

29 Apr 2015 - 12:35 pm | नाखु

"गुप्त" नाव फोडून जाहीर केल्या बद्दल निषेध.

आता एकशे एक वेळा लिहून काढ

निमित्त्-निमिष्
निस्सीम-निदान
आजचा ग्रुहपाठ म्हून.

जल्ला तेवढा ग्रुहपाठ सोडुन निषेध स्विकारण्यात येत आहे.

होबासराव's picture

29 Apr 2015 - 12:39 pm | होबासराव

:)

कारण मला हे कोल्हापूर वगैरे काय म्हणत आहेत ते समजले नाही. कृपया शीर्षक बदलून "पैसा पुराण" किंवा वाचकाना जे हवे असेल ते करण्यासाठी कोठे क्लिक करावे लागेल ते सांगा, मी करतो. शीर्षक मला महत्वाचे नाही. लेख महत्वाचा आहे.

पैसा's picture

29 Apr 2015 - 12:46 pm | पैसा

तुमचा किंवा लेखाचा प्रॉब्ळम नाय. आम्ही जरा दुसर्‍या धाग्याबद्दल मधेच गंभीर चर्चा करत होतो. मिपाच्या पहिल्या पानावरचे धागे वाचलेत तरी तुमच्या लक्षात आलं असतं.

यसवायजी's picture

29 Apr 2015 - 12:49 pm | यसवायजी

हो ना. कैच्याकै चाल्लंय राव. इशय काय? कोल्लापुर कुटं? यांना लेख महत्वाचा नाही. शीर्षक महत्वाचे आहे.

सोणार साहेब कधितरी इतरांच्या जिलब्यांनाही आपले म्हणा.
मग लागतील संदर्भ,

:)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा

=))))))

मराठी_माणूस's picture

29 Apr 2015 - 12:45 pm | मराठी_माणूस

आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच

हे फळ म्हणजे अधिक पैसा का ?

होबासराव's picture

29 Apr 2015 - 1:28 pm | होबासराव

आपल्या जिलब्या आम्हि फ्रीज मध्ये जपुन ठेवल्यात.
एका आपटार्ड मित्रा बरोबर पैज लागलिय, खरे तर त्याला समुपदेशना चि नितांत आवश्यकता आहे पण पठ्ठा ऐकत नाहिये. नॅस्ट्रॉडेमस नि उल्लेख केलेला भारतिय युगपुरुष असल्याच्या तोर्‍यात वावरतोय तो. पैज हारल्यास मि सांगेल ते त्याला करावे लागणार आहे. सो त्यावेळेस आपले लेख त्याल वाचायला दिले जातील आणि त्यावर प्रश्णोत्तर तास सुध्दा ठेवल्या जाइल :) (ह्.घ्या. :))

अन्या दातार's picture

29 Apr 2015 - 2:56 pm | अन्या दातार

इतक्या चांगल्या प्रबोधनपर धाग्यावर चाललेला निरर्थक दंगा पाहून एक मिपाकर म्हणून लाज वाटली.

लाजेला घाल पापाच्या तिकटीत. ९ ला रात्री बसायची सोय कुठं केलीस ते सांग.

नाखु's picture

29 Apr 2015 - 3:02 pm | नाखु

तुमचीच बाकी होती, जरा सरकून घ्या रे नवा भिडू आलाय जरा बॅट्याला पण जागा ठेवा !!!

मुद्दाम घुसेन
लाज वाटणार्‍या मिपाकरांचा सालस* मित्र

*शब्दाचे अर्थाचे हक्क कॅप्टनने राखून ठेवले आहेत तेव्हा माहीतीकरता व्यनी करा.
अक्षीहित.

अन्या दातार's picture

30 Apr 2015 - 3:22 pm | अन्या दातार

निमिष सोनार यांचे लेख मला खरंच आवडतात. खुप विचार करुन लिहिलेले असतात.

आणि वाचल्यानंतर खुप विचार करायला प्रव्रुत्त करतात्..खरच. कस ईतक छान छान, इतकि खोलि असलेल आणि सौन्दर्यानुभुती देणार लेखन असत.

आपले लेख खुपच विचारप्रर्वतक असतात. लोकांना जिल्ब्या का वाटेनात.. टाकत रहा ... सॉरी... टंकत रहा!!

महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला?

आयला! चाणक्य पण महाग्रू होते?? मला वाटलं ते आपले .... च आद्य महागुरू.

चाणक्याचे अर्थविषयक विचार वाचायला आवडतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 6:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा पुराणाचं नित्यानेमानी पठण करणार्‍यांवर काजुकृपा होते असं ऐकिवात आहे. ख.खो.दे.जा. :P

मोहनराव's picture

29 Apr 2015 - 6:41 pm | मोहनराव

ये ख.खो.दे.जा क्या है, ये ख.खो.दे.जा ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खरं खोटं देव जाणे.

मोहनराव's picture

29 Apr 2015 - 7:00 pm | मोहनराव

धन्यस!!

निमिष सोनार's picture

30 Apr 2015 - 1:42 pm | निमिष सोनार

द्या सगळ्यांना!

निमिष सोनार's picture

30 Apr 2015 - 1:48 pm | निमिष सोनार

कुठे आहे तराजू
आणा सगळे काजू
आपण ते मोजू

निमिष सोनार's picture

30 Apr 2015 - 1:48 pm | निमिष सोनार

भाजू

निमिष सोनार's picture

30 Apr 2015 - 2:48 pm | निमिष सोनार

----------------
कुठे तराजू
आणा काजू
आपण मोजू
तव्यावर भाजू
नका लाजू
खाऊन माजू
पाणी पाजू
-----------------

... मी पण ठरवलं की विसंगर पीजे कविता टाकू आणि ती वाचून तुम्हाला कसा त्रास होतो ते पाहू!

पैसा's picture

30 Apr 2015 - 4:10 pm | पैसा

गृहपाठ म्हणून मिपाच्या पानावरचे सगळे धागे वाचा आणि एकेक प्रतिक्रिया देऊन या बघू!

उगी उगी बाळा... रडु नकोस... तो बघ तुझा मित्र पप्पु आला..

नूतन सावंत's picture

30 Apr 2015 - 4:04 pm | नूतन सावंत

प्रबोधन चांगले आहे.पैसा पुराराणाचे पैसाताईचे पुराण कधी झाले हे समजले सुद्धा नाही.हलके घ्या हो पैसाताई.

पैसा's picture

30 Apr 2015 - 4:12 pm | पैसा

ट्यार्पी मंगताय! तसेही माझ्या आयडीवरून आलेले प्रतिसाद अवांतर म्हणता येणार नाहीत! =))

कर्म लेखकाचे, दोष "प्रतिसादका ला"

ये ना चॉलबे.

अति-वैचारीक** लेखनात वाचकाचा बळी !!

** चिंता वाहतो विश्वाचि