एकापेक्षा एक.

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
9 Oct 2012 - 5:55 pm

स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार)

"एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह""

"कोणाला हवी आहे" - दुकानदार

"मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात)

"** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर)

" ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?"

" लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात"

"तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?"

" आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?"

"("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना. मी बघेन माझे मी काय करायचे ते"

" घ्या मला काय करायचे आहे? फाटली तर बदलुन मिळणार नाही"

" तुम्ही सांगितल्याप्रमाणे ** ची घेतली आणि फाटली तर बदलुन मिळेल?"

(हा अनपेक्षित प्रश्न होता. पकडला रे पकडला. हे परत आपले मनातच)

दुकानदार देखील गोंधळला. पण वरकरणी चेहरा निर्विकार ठेवत " नाही फाटलेल्या चड्ड्या आम्ही बदलुन देत नाही"

"ठीके द्या रुपाची एक ** ची. मी बघेन माझे मी"

"रुपाची नाही आमच्याकडे"

इथे हा त्यापुढे आमच्याकडे वापरलेल्या मिळत नाहित असे म्हणेल असे जाणवल्याने मी फारसे ताणले नाही. आजुबाजुला माझ्या मित्रांपैकी काही करप्ट मित्र असले असते तर "रुपाची द्या" या शब्दावर फिदीफिदी हसले असते. त्यामुळे मग मी सावरुन लगेच व्हीआयपी मागितले. ते ही नव्हते. मग म्हटले जी असेल ती द्या.

"एकाच रंगाच्या आहेत" - दुकानदार

"द्या हो. काय फरक पडतो? कोण बघायला येतय रंग" मी वातावरण निवळवण्याच्या दृष्टीने एक क्षीण प्रयत्न केला

" ते आमाला काय माहित नाय. रंग बदलुन मिळणार नाही."

( "रत्ताळ्या तुझ्याकडे एकाच रंगाची एकाच कंपनीची अंडरवेयर असेल तर मरायला तु बदलुन देणार तरी कुठुन?" हे परत आपले मनात)

थोडा वेळ शोधुन झाल्यावर दुकानदार परत:

"** ची नाही आमच्याकडे ** ची च आहे. तीच घ्या. तुमाला नीट बसेल" (असे आहे होय? म्हणून ** ची घ्या म्हणत होतास होय रे ****) मी स्वतःच्या थोतरीत २ बडवुन घेतल्या (हे पण मनातच. च्यायला स्वतःकडे साइझ नाही म्हणुन जे आहे ते माझ्या गळ्यान मारु बघणार्‍या त्या फडतुस दुकानदारासाठी मी कशाला खरोखर स्वतःला २ लगावुन घेउ?)

अवांतरः तुमची साइझ काय आहे ते नाही सांगितलेत असला हलकट प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाइल हे लक्षात घ्यावे ;)

*******************************************************************************

स्थळ: मालवण. एक नावाजलेली खाणावळ

साधारण दुपारी २ वाजता. मालवणच्या बाजारात शाकाहारी भोजनाची (मालवणात शाकाहारी भोजन शोधणारे म्हटल्यावरच निम्म्या लोकांच्या चेहर्‍यावर तुच्छ भाव येतील) वाट शोधणारे पुण्यातले ७ अभागी जीव. शाकाहारी भोजनाच्या सर्व वाटा एकाच खाणावळीत जाउन थांबतात असे कळल्याने वणवण हिंडत (मालवण कितीसे मोठे म्हणा असे)एकदाचे इच्छित स्थळी पोचले. छोट्याश्या खाणावळीत तुडुंब गर्दी भरलेली. मालकांनी दारातच स्वागत केले ( न जाणो चुकुन आत वगैरे घुसले म्हणजे जेवायला घालावे लागेल. खाणावळ चालवत असलो म्हणुन काय झाले असे कोणालाही आत येउ देउ का आम्ही? )

" ७ जणांसाठी जेवायला मिळेल का?"

"थांबायला लागेल. गर्दी आहे"

"साधारण किती वेळ"

"ते कसे सांगणार? बसलेले लोक उठले की देतो तुम्हाला"

"काय मेन्यु आहे?"

मेन्यु शब्द उच्चारल्यावर चेहर्‍यावर कमालीच खवट भाव आले. तो शब्द अस्थायी होता असे अगदी त्या भुकेल्या जीवांना देखील वाटले (मी त्या भुकेल्या जीवांपैकी एक होतो. खोटे कशाला बोला.)

" भेंडीची भाजी, ताकातला पालक, आमटी, पोळी, भात, कोशिंबीर, चटणी"

" उकडीचे मोदक मिळतील का?"

"उकडीचे मोदक काय असे कधीही मिळतात का हो?" (आम्ही उकडीचे मोदक मागुन प्रचंड मोठा प्रमाद केला आहे हे आम्हाला तत्क्षणी लक्षात आले. पेटा वाल्यांसमोर जाउन "बेबी क्रोकोडाइल" मिळेल का असे विचारल्यावर तो जेवढा मोठा प्रमाद होइल. तेवढाच मोठा)

" पीठ चाळावे लागते, मळावे लागते. भिजवावे लागते. बराच वेळ लागतो"

"आत्ता ऑर्डर दिली तर संध्याकाळी मिळतील का?" आम्ही भयानक भीत भीत अतीव आदराने विचारले.

"२ दिवस आधी ऑर्डर द्यायला लागते हो. लगेच मिळत नाहित"

"ओल्या काजुची उसळ मिळेल का?" "ऑर्डर दिली तर. संध्याकाळी" आम्ही घाईघाईने अ‍ॅडवले. कारण अजुन एकदा मालकांनी खेकसणे परवडणार नव्हते. खाण्यापिण्याचे आधीच वांधे होते.

" हा ओल्या काजुंचा सीझन नाही. या दिवसात ओल्या काजुची उसळ आमच्याकडे मिळत नाही"

"इतर कुठे मिळु शकेल का?"

"कोपर्‍यावर अजुन २-३ हॉटेल्स आहेत. तिथे बघा मिळतीय का. मी ग्यारंटी देत नाही. चांगली असेल की नाही. आमच्याशिवाय इतर कुठे चांगली मिळते का ते मला माहिती नाही"

"बर आत्ता तर बराच वेळ लागेल असे दिसते आहे. आम्ही निघतो. संध्याकाळी मिळेल ना जेवण"

"ते आत्ता कसे सांगु शकतो? संध्याकाळी या. वेळेत आला, शिल्लक असेल तर नक्की देतो"

केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर इतका अपमान सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो.

*******************************************************************************

स्थळ: पुणे. मध्यवस्तीतले आता बंद पडलेले एक उडुपी उपाहार गृह

" १० चीज बर्गर द्या हो" ( मास्तरच्या पैशाने खायला मिळते आहे तर का सोडा या सदसदविवेकबुद्धीने पार्सल घ्यायाला आलेला एक यडचाप तरुण. एरवी गपगुमान हातगाडीवरचा वडापाव खाणार. पण फुकट मिळतय तर "आम्ही ब्वॉ रोज चीज बर्गरच खातो") (मीच तो. मीच तो. )

"थोडा रुको. अभी देता है"

१५ मिनिटांनतर "देताय ना. उशीर होतो आहे"

" बन ला रहा है. रुकिये ५ मिनिट सिर्फ" (उशिर होतो आहे म्हटल्यावर रुको च रुकिये झाले होते आता. थोड्यावेळाने तो "स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार." असेही म्हणाला)

हे बन ला रहा है प्रकरण मला काही झेपले नाही. इथे काय बर्गरची ऑर्डर मिळाल्यावर जवळच्या बेकरीतुन बन आणायला पळतात का?

अजुन १० मिनिटांनी " किती वेळ लागेल अजुन?"

"क्या स्सर?" (आता याला मराठी कळेनासे पण झाले. बोलता तर आधीपासुनच येत नव्हते)

"कितना टाइम लगेगा? अर्धे घंटेसे वाट बघ रहा हू मै. अभी क्या चीज लावोगे क्या?"

"स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार."

अजुन १० मिनिटानी मरो ते बर्गर म्हणुन उठु पाहणार्‍या माझ्या हातात १० बर्गर शेवटी एकदाचे कोंबले गेले.

मी धावत पळत ऑफिसला गेलो. एव्हाना मास्तरचे ४ फोन आले होते (हापिसात गेल्यावर काय रे गाय पकडुन तिचे दूध काढुन त्याचे चीज करुन घेउन आलास काय? असे ऐकायला लागले ते वेगळे)

बर्गरचे खोके उघडल्यावर अस्मादिकांच्या लक्षात आले की अरेच्चा यात तर कटलेटच नाही. फक्त चीजच आहे. (बनसुद्धा बनपावाचा बन होता हो).

चरफडत अखेर ते तसेच खाल्ले. परत जाउन घेउन येण्याइतकी भूक कोणाला धरवत नव्हती. बर्गर (सॉरी चीज बन) खाता खाता सगळे मला शिव्या घालत होते.

हा अपमान असह्य होउन मी एक बाणेदार पुणेकर तडक त्या मद्राश्याच्या हॉटेलात जाउन धडकलो.

"तुम्हारे बर्गर मै कटलेट नही था"

"ऐसा हो ही नही सकता"

"मग मी काय खोटे बोलतोय का?" रागवताना इनोदी हिंदी नको म्हणुन मी सुंबडीत मराठीवर आलो.

त्यावर २ मद्रासी एकमेकांशी अगम्य भाषेत यंडु गंडु पांडु नारु सारु असे काहिसे बोलले आणि मग तिसराच बाबा माझ्याकडे आला.

"क्या हुआ सर?"

एव्हाना रागावर नियंत्रण मिळवलेला मी त्याला सर्व डिटेलात सांगण्याच्या मुडात आलो होतो. सगळे ऐकुन त्याच्या चेहर्‍यावर "देयर यु आर" असे भाव आले:

"चीज बर्गर मे कटलेट नही होता है सर? व्हेज बर्गर मे होता है. आपने चीज बर्गर लिया था ना? तभी तो."

"चीज बर्गर मध्ये कटलेट नसते? काहितारी काय? सगळीकडे मिळते"

"नही सर इटली मे भी ऐसेहीच रहता है"

"इटलीत पिझ्झा मिळतो. बर्गर नाही"

" हा. पर हमारे यहा बर्गर ऐसेही मिल्ता है"

"अर्रे तुम कल बर्गर मे शेपुकी भाजी डाल के दोगे और बोलोगे हमारे यहा ऐसेहीच मिलता है. ऐसा थोडेही ना होता है?" (माझ्या चेहर्‍यावर क्षणभर गड सर केल्याचे भाव होते. क्षणभरच राहिले)

"हमारे यहा शेपुकी भाजे नही डालते बर्गर मे" म्यानेजर ने तेवढ्याच मख्खपणे सांगितले.

यानंतर त्या **** शी भांडण्याचे त्राण अंगात नसल्याने आणि असाही तो बर्गर फु़कटच असल्याने (माझ्यासाठी. दिडक्या मास्तरने मोजल्या होत्या ना), मी हताशपणे चालता झालो. जाताना "ऐसा करोगे तो हॉटेल बंद हो जायेगा जल्दी ही" असे म्हणायला विसरलो नाही. माझी शापवाणी खरी ठरली. थोड्याच वर्षात हॉटेलचा बाजार उठला. आता तिथे एक कॅफे दिमाखात उभा आहे. पण अजुनही त्या जागेत जायचे धैर्य होत नाही मला.

*********************************************************************************

काही नाही पुण्यातले मराठी दुकानदार सौजन्य महर्षी वाटतील असे दुकानदार जगात अस्तित्वात आहेत हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.

हे ठिकाणवावरसंस्कृतीधर्मपाकक्रियाप्रेमकाव्यविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवमतवादविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

9 Oct 2012 - 6:30 pm | बॅटमॅन

नग सर्वत्रच असतात तसे, पण पोर्ट्रेयल आवडेश.

तर्री's picture

9 Oct 2012 - 6:41 pm | तर्री

पुण्याच्या अस्मिता रुपी सापावर चुकून पाया पडला आहे.

फुडच्या लेकनास आमच्या जोर्दार सुबेच्चा.
पुनेरी लोकान्ला न्याव मिलवून दिल्याबद्दल हाबार. ;)

किस्से धमाल आहेत, पण...(तोच सागेगम फेम देवकी पंडितवाला)

केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर इतका अपमान सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो.

ह्याची काय गरज होती? ट्यार्पी खेचायला ? ;)
मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.

सस्नेह's picture

9 Oct 2012 - 9:24 pm | सस्नेह

सहमत.

तुम्ही जर मालवणातल्या गणेश देवळामागच्या खाणावळीबद्दल बोलत असाल तर,जे झालं त्यात अपमान असण्यासारखं काही नाही, त्या खानावळीच्या जेवणाला आणि ते बनवणा-याला लाख लाख सलाम, उकडीचे मोदक, कढी, लिंबाचं लोणचं(लोकल)आणि भात असं लिमिटेड जेवण जेवलोय तिथं, एवढ्या साध्या पदार्थात जो जीव ओतला होता त्यांचं नाव ते... लईच्च बेकार.

राजेश घासकडवी's picture

10 Oct 2012 - 9:20 am | राजेश घासकडवी

मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.

सहमत. "केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर गिऱ्हाइकाविषयी इतकी बेपर्वाई सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो."
हे वाक्य जास्त योग्य ठरलं असतं.

मृत्युन्जय's picture

10 Oct 2012 - 10:14 am | मृत्युन्जय

ज्येष्ठ संपादक गणपाभौंशी शमत आहे.

सस्नेह's picture

9 Oct 2012 - 9:27 pm | सस्नेह

किस्से भारी आहेत. आणि खुसखुशीत लेखनशैलीची जोड मिळाल्यामुळे मजा आली वाचायला.

जाई.'s picture

9 Oct 2012 - 9:29 pm | जाई.

धमाल किस्से

यशोधरा's picture

10 Oct 2012 - 8:37 am | यशोधरा

काजूची उसळ खरेच प्रत्येक सीझनमध्ये मिळू शकत नाही आणि उकडीचे मोदक बनवायला खरोखरच वेळ लागतो. कोकणात तयार सुवासिक पिठीपासून बनवत नैत मोदक. :P त्या हाटेलवाल्या काकांच काही चुकलं नै. तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची! :P

आणि शेवटी अतिसौजन्यसप्ताहवाल्याच्या हाटेलाचाच पंचनामा झाला म्हणायचा.

तात्पर्यः बिजिनेस करताना फक्त गोड बोलून काम साधत नाही, तेथे पाहिजे कामसूपणाचे, येरा आळशाचे काम नाही!

मृत्युन्जय's picture

10 Oct 2012 - 10:21 am | मृत्युन्जय

शमत आहे. पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. बर्‍याच वेळा बर्‍याच ठिकाणी तसे ते तयारच असतात.

कोकणात गेल्यावर उद्या कोणी मासे आहेत का असे विचारल्यावर " मासे काय असे लगेच मिळतात का हो? आधी जाळे टाकावे लागते, मासे पकडावे लागतात, चांगले मासे निवडुन सोलावे लागतात, मसाला तयार करुन मासे त्याच्यात घोळवावे लागतात. बरीच मोठी प्रक्रिया आहे ती." असे जर कोणी सांगितले तर मी तरी त्या इसमापुढे हात टेकीन.

तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची!

याच्याशीही शमत आहे. पण मग पुणेरी टाचणी लागल्यावर लोकांची एवढी मळमळ का होते तेच समजत नाही (हे तुझ्यासाठी नाही. नाहितर मारशील मला)

५० फक्त's picture

10 Oct 2012 - 10:47 am | ५० फक्त

पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. - याच्याशी सहमत.

ब-याच ठिकाणी दिवे आगार / दापोली - बापट दोन्हीकडे ,मालवणला मयेकर / वर उल्लेख केलेली गणेश मंदिरामागची खानावळ, इथं तर संध्याकाळी जेवणात किती मोदक हवेत याची ऑर्डर दुपारी द्यावी लागते, तरच संध्याकाळी तेवढेच मोजुन तेवढेच मोदक मिळतात.

आमच्यासमोर कोकण आणि पुण्यास नावे ठेवू नये. कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे :)

मोदक असतात रे तयार, पण ते नेहमीचा तसा व्यवसाय असला तरच असतील असे वाटते मला. नाहीतर कोकणात ते सगळे बनवायचेही फार कष्ट असतात. म्हणजे पहा, नारळ पाडायचा, मग सोलायचा, मग खोबरे खवायचे, त्याच्या पाण्याने ती उकड मळायची.... बरेच निगुतीने बनतात ह्या रेश्प्या. त्यामुळे ते करुन ठेवणे सगळ्यांनाच परवडेल असे नै.

गवि's picture

10 Oct 2012 - 1:16 pm | गवि

अत्यंत सहमत.

आधीच तयार केलेले थंडगार मोदक स्टॉलवर /जाळीच्या झाकणाखाली बटाटेवड्यांसारखे मांडून ठेवणारा हाटेलवाला किंवा दुकानदार हा कोंकणातला नसून बाहेरुन आलेला धंदेवाईक आहे किंवा उत्तम जुन्या कोंकणी व्यावसायिकाची पुढची पिढी आहे हे ओळखून असावे.

किमान दोन तासांच्या ऑर्डरीने मोदक बनवून देणार्‍या अनेक माऊल्या आहेत गणपतीपुळ्याला. पण ऐनवेळी हवे म्हणाल तर नाहीच शक्य.

इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे..

बाकी पुण्यांत लोक कोंकणातूनच आलें आहेत असें आमचें म्हणणें आहें.

इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे..

मला वाटते ते वझ्यांनी 'काय कटकटै.. एकदा सांगून कळत नाही का' असं वाटून वैतागून दिलेले उत्तर असावे. ही जय गणेश खानावळ नक्की नाही. पोष्टाफिसाजवळची वझेंची खानावळ ही. तेच ते! :)

बाकी यशोमतीमैय्याच्या वाक्यावाक्याशी शमत.

मृत्युन्जय's picture

10 Oct 2012 - 1:19 pm | मृत्युन्जय

तर तर. दोन्ही आमचेपण आहेच की. :)

कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे
हे आधी नाही सांगायचेस? मला वाटायचे माझेच आहे म्हणून. बरं झालं योग्य माहिती मिळाली. ;)

यशोधरा's picture

12 Oct 2012 - 10:39 pm | यशोधरा

रेवती, तुझे आणि माझे. खुश? थोडीशी जागा मेव्याला देऊ. ;)

ज्ञानराम's picture

10 Oct 2012 - 9:34 am | ज्ञानराम

मजा आली ,

पाषाणभेद's picture

10 Oct 2012 - 9:49 am | पाषाणभेद

+१००-१

किस्से एकदम झकास.
लेखकाने लेखात लग्नाळू असल्याचे जाणवून दिले आहे.

मृत्युन्जय's picture

10 Oct 2012 - 10:15 am | मृत्युन्जय

दया करा देवा. एका लग्नात वाट लागली आहे. पुनःश्च लग्नाळू कशापायी करताय? सगळे किस्से अंमळ काही काळापुर्वीचे असल्याने काही संदर्भ तसे आले असावेत कदाचित (उदा. मी तरूण असण्याचे. पण तसा मी अजुनही तरुणच आहे ;) )

अमोल केळकर's picture

10 Oct 2012 - 10:16 am | अमोल केळकर

मस्तच :)

अमोल केळकर

प्रमोद्_पुणे's picture

10 Oct 2012 - 11:37 am | प्रमोद्_पुणे

:) अरे खानावळ चालकाचे आडनाव लिव की ;)

सविता००१'s picture

10 Oct 2012 - 1:23 pm | सविता००१

छान लिहिलय. मजा आली वाचायला. पु.ले.शु.

गोमटेश पाटिल's picture

10 Oct 2012 - 2:06 pm | गोमटेश पाटिल

YEKAPEKSHA EK mastach aahet kisse pan "sudya" vachakancha pratikriyahi khup chan aahet.....

गणपा's picture

10 Oct 2012 - 2:25 pm | गणपा

"sudya" सुड्या ???
'सुज्ञ' म्हणायचय असेल बहुतेक. :)

समीरसूर's picture

10 Oct 2012 - 3:29 pm | समीरसूर

आवडले किस्से. :-)

एका फुले विकणार्‍या दुकानात मध्ये गेलो होतो. तिथे एक बाई हार तयार करत बसली होती. वय साधारण ५०-५५ च्या आसपास असावे.

"मावशी, फुले द्या थोडी बांधून"

"......."

माझ्याकडे त्या बाईने ढुंकूनही पाहिले नाही. मी तिच्या प्रतिसादाची वाट बघत थांबलो. मला वाटलं हातातले फूल ओवल्यानंतर तरी ती माझ्याकडे बघेल पण कसले काय. कॉलेजात सुंदर मुलीने आपल्याकडे बघावे यासाठी मी जितका आसुसलेलो नव्हतो तितका त्यावेळी त्या बाईने माझ्याकडे बघावे म्हणून अधीर झालो होतो. मला घाई होती. बाबा पूजा करण्यासाठी बसले होते आणि फुलेच नाहीत असे लक्षात आल्यावर ते खट्टू झाले. मी त्यांना म्हटले तुम्ही पूजा सुरु करा मी पटकन घेऊन येतो. फुलांशिवाय पूजा म्हणजे सोड्याशिवाय व्हिस्की! किंवा चिकनशिवाय पार्टी!

"मावशी, फुलं द्या ना लवकर"

मी पुन्हा म्हटले. मावशी तरीही हलल्या नाहीत.

"मावशी, फुलं देताय ना?"

मी पुन्हा म्हटले. तरीही (आई शप्पथ सांगतो, खोटं असल्यास पुढच्या जन्मी मी आफ्ताब शिवदासानी व्हायला तयार आहे) मावशी ढिम्म!

थोड्या वेळाने डास जास्त गुणगुण करायला लागल्यावर आपण ज्या त्रासिक मुद्रेने पाहतो तसं तिने माझ्याकडे पाहिलं. नुसतंच कपाळ उडवून तिने काय पाहिजे (काय ताप आहे डोक्याला असंच म्हणायचं होतं बहुतेक तिला) असं विचारलं.

"फुलं"

तिने बांधून दिले.

"किती झाले?"

"....."

"किती द्यायचे?"

"...."

मावशी पुन्हा मनमोहन सिंग झाल्या. मी भीतभीतच दहाची नोट पुढे केली. अशी माणसे खवळली तर भरतीच्या समुद्रापेक्षा बुडाऊ असतात असे ऐकले आहे.

"किती?" मी नोट पुढे करत असतांना पुन्हा क्षीणपणे विचारले.

"दह्ह्हा" तिने तिच्या सुमधुर आवाजात सांगीतले. मी पुडी उचलली आणि तिथून अदृष्य झालो. :-)

सुधीर's picture

10 Oct 2012 - 5:01 pm | सुधीर

किस्से अन लिहिण्याची "ष्टाईल" आवडली. :)

मदनबाण's picture

10 Oct 2012 - 10:46 pm | मदनबाण

जबराट ! ;)

नर्मदेतला गोटा's picture

10 Oct 2012 - 11:28 pm | नर्मदेतला गोटा

> ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला.

तुम्ही ऐश्वर्या रायवर मरता तर

किसन शिंदे's picture

11 Oct 2012 - 5:32 am | किसन शिंदे

:D मृत्युंजया, पहिला किस्सा लय भारी. लिहण्याची स्टैल पण मस्तच.

सुहास..'s picture

11 Oct 2012 - 2:23 pm | सुहास..

ही ही ही !

पैसा's picture

12 Oct 2012 - 9:23 pm | पैसा

लय भारी किस्से! पुणे आणि पुणेकरांना काही पण म्हणा, कोकण्यांना नावं ठेवायचं काम नाय! :D

ज्योताय, असं नाय म्हणायचं गं!
वैसे मेरा पण पयला प्यार कोकणच म्हणा! ;) पण तरी पुण्याला कायपण नाय म्हणायचं हां.

पैसा's picture

12 Oct 2012 - 11:02 pm | पैसा

पुण्यातले अर्धे अधिक लोक कोकणातून तिकडे विस्थापित झालेले आहेत त्यामुळे पुण्याला पण आमचं म्हणूया!

तसंही आता पुणंही तुमचंही आहेच बर्का! ;)

पुणं पैसाताईचं कस्काय ब्वॉ? ते तुझं, माझं अन् थोडं मेव्याचं असं ठरलं होतं ना!

यशोधरा's picture

13 Oct 2012 - 8:48 am | यशोधरा

आहे आहे थोड्ड्सं!

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 10:28 pm | सोत्रि

तुमची साइझ काय आहे ते नाही सांगितलेत असला हलकट प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाइल हे लक्षात घ्यावे

ज्यांना तुमचे प्रत्त्यक्ष दर्शन झाले आहे त्यांना हा प्रश्न पडणार नाही :P

- ('त' वरून ताकभात ओळखणारा हलकट) सोकाजी

मृत्युन्जय's picture

13 Oct 2012 - 10:17 am | मृत्युन्जय

च्यामारी प्रत्यक्ष ओळखणार्‍यांना माझा साइझ कसा कळणार म्हणे. स्पष्ट लिही रे सोक्या नाय तर लोकांचा गैरसमज व्हायचा माझ्याबद्दल ;)

बादवे मला तुझ्या प्रतिसादावरुन एकदम वन टु थ्री मधला परेश रावल आठवला. त्याच्या अंडरगार्मेंट्स चा व्यवसाय असतो आणि तोही असाच माणूस बघुन कच्छे बनियान चा साइझ सांगत असतो :P

तिमा's picture

13 Oct 2012 - 6:15 pm | तिमा

तुमचा साईझ विचारत नाही. पण दुकानात कुठला साईझ आणि रंग होता ते सांगता का ?

मृत्युन्जय's picture

13 Oct 2012 - 10:22 am | मृत्युन्जय

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. धागा वाचुन प्रचंड जळजळ होउनही प्रतिसाद न दिलेल्यांचे डब्बल धन्यवाद. त्यामुळे धागा ट्रॅकवर राहिला ;)

असो. कोकणावर कुठलीही टीका न करताही कोकणाच्या अस्मितेला धक्का पोचल्याबद्दल इतकी नाराजी व्यक्त होउ शकते तर उठसुट पुण्यावर टीका करुनही थोडी जरी नाराजी व्यक्त केली तर त्याला खाजुन अवधान आणणे असे का म्हटले जाते ते कळत नाही. ;)

चला पुरेसे तेल ओतुन झाले आहे. अजुन १० प्रतिक्रिया देउन धाग्याची हाफ सेंचुरी पुर्ण व्हायला किमान हरकत नाही आता. मग मी टेचात सांगु शकेन की आजकाल माझे धागे किमान हाफ सेंच्युरी तरी मारतातच ब्वॉ. :D :P

Nitin Palkar's picture

17 Oct 2017 - 8:13 pm | Nitin Palkar

मजेशीर आहे...