मुक्त कविता

कण अमृताचे......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Sep 2022 - 12:05 pm

आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही

पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही

करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही

आयुष्यमुक्त कविताकवितामुक्तक

मिपा कट्टा पुणे २०२२....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
17 Sep 2022 - 8:43 am

सारे रोजचे तरीही.....
हवे हवेसे वाटे
निशाचे ते जाणे
आणी उषाचे भेटणे

गवाक्षातून झाके
सोनसळी तिरीप
पुन्हा नव्याने येतो
जगण्या हुरूप

सारे रोजचे तरीही.....

पालवी फुटते
रात्रीच्या स्वप्नानां
अधिरते मन
कवेत घ्यायाला

गेले कालचे विरून
निराशेचे सुर
मन आभाळी आले
ढग आशेचे भरून

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे......

दमून भागून
जीव झाला क्लांत
पुन्हा घरट्यात येतो
घ्याया विश्राम निवांत

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे
निशाचे ते येणे.....

festivalsआनंदकंद वृत्तमुक्त कवितामुक्तक

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
2 Sep 2022 - 9:21 pm

चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्‍या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.

Nisargगजेंद्रनिसर्गमाझी कवितामुक्त कविताविठोबाशिववंदनाश्रीगणेशवीररसरौद्ररसशांतरसचारोळ्यामुक्तकव्यक्तिचित्र

आठवण....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
14 Aug 2022 - 7:59 am

https://www.misalpav.com/node/50568/backlinks

आमची बी एक आठवण...
कविवर्यांची क्षमा मागीतली आहे.

खिशातल्या रूमालाला
घामाचा वास
मनाला लागला
तूझाच की ग ध्यास

चार कप्प्यातला
एक कप्पा होता खाली
तू येणार म्हणून
साफसफाई केली

घरावरून मारल्या
दिवसाच्या चकरा सात
बात नाय बनली कारण
जय विजय उभे दारात

बांधीन म्हणलं
सात तळाची माडी
पण सावळ्या कुभांराची
गाढवं मधी आली

उकळीप्रेरणात्मकमुक्त कविताविडम्बनकविताविडंबन

तू.....

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
19 Jul 2022 - 11:12 pm

तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा

तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा

तू जराही वळून न पाहता निघून जायचीस
मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात
डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे
मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा

मुक्त कविताकविता

आठवणींचा पाऊस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
13 Jul 2022 - 5:33 pm

रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो

संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो

रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.

- पाभे
१३/०७/२०२२

आठवणीपाऊसमुक्त कविताकविताजीवनमान

वळण नसलेल्या वाटेवर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
27 Jun 2022 - 10:43 am

*वळण नसलेल्या सरळ वाटेवर*
जेंव्हा कोणीतरी खास भेटतं
मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं

वादळ आणी पाऊस
मग नित्याच होतं पण
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं

सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा
संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो
आणी हवाहवासा गारवा
वाटेवर पसरतो

भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ
पुन्हा एकदा कुशीत येते
अन वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते

आसेच कुणीतरी
खास भेटावे
प्रत्येकाला वाटते
मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते
२७-६-२०२२

आयुष्याच्या वाटेवरमुक्त कविताकवितामुक्तक

कोण?

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
28 May 2022 - 7:59 pm

मोकळ्या अवकाशाचे अंगण
हाक कोणाची? मधाळ चांदण

उरात धडधड अनवट वाटा
धाडतो कोण?निमीष लाटा

मेघांनी बांधले स्वप्नांचे झुले
कोण?उधळतो ढगांची फुले

धारा ..वारा..स्वैर पसारा
देह कोणाचा?संचित पहारा

ज्योत दिव्याची अधीर नाही
ओह?पाकोळीची तिज तिलांजली

मेंदीचा गंध वेचला भाव विभोरी
उमलली संध्या मिटण्या भु-वरी?

gholमुक्त कविताकविता

ब्लिडींग हार्ट....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
26 May 2022 - 8:16 am

खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

भेटता रक्तस्त्राव हृदय फुले
कळाली अमर प्रेम कहाणी
"ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे
गात आहेत विरह गाणी

वेदना त्याच्या जीवाच्या
तेव्हांच मला कळाल्या
भंगून हृदय जेंव्हा
रक्त पाकळ्या गळाल्या

निसर्गप्रेम कवितामुक्त कवितासांत्वनाप्रेमकाव्य