Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कर्नलतपस्वी on Sat, 09/17/2022 - 08:43
सारे रोजचे तरीही..... हवे हवेसे वाटे निशाचे ते जाणे आणी उषाचे भेटणे गवाक्षातून झाके सोनसळी तिरीप पुन्हा नव्याने येतो जगण्या हुरूप सारे रोजचे तरीही..... पालवी फुटते रात्रीच्या स्वप्नानां अधिरते मन कवेत घ्यायाला गेले कालचे विरून निराशेचे सुर मन आभाळी आले ढग आशेचे भरून सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे...... दमून भागून जीव झाला क्लांत पुन्हा घरट्यात येतो घ्याया विश्राम निवांत सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे निशाचे ते येणे..... भगवंताचे देणे चाले असाच चरितार्थ सारे रोजचे तरीही..... कट्ट्यावर येवून साधावा परमार्थ. १७-९-२०२२ पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l 👍 .......... 🙂

Submitted by हेमंतकुमार on Sat, 09/17/2022 - 09:00

Permalink

वा !

सुंदर ! भेटूच....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 09/17/2022 - 09:05

Permalink

कट्टा सुरू झाला का?

इथेच वृत्तांत आला तर उत्तम ....
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Sat, 09/17/2022 - 09:54

Permalink

कोणी पोहचल आहे का?

कोणी पोहचल आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Sat, 09/17/2022 - 10:05

Permalink

स्वसंपादित

स्वसंपादित
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 09/17/2022 - 10:07

Permalink

खुप छानसुंदर !

खुप छानसुंदर ! सारे रोजचे तरीही नवा प्रकाश प्रकाश .. फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश " या ओळी आठवल्या. भेटूयात!
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sat, 09/17/2022 - 10:47

In reply to खुप छानसुंदर ! by चौथा कोनाडा

Permalink

होय

सकाळीच ऐकताना सुचले.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 09/17/2022 - 10:39

Permalink

कट्टा सुरू झाला ...

आता, इथेच वृत्तांत येऊ द्या
  • Log in or register to post comments

Submitted by ॲबसेंट माइंडेड… on Sat, 09/17/2022 - 10:52

In reply to कट्टा सुरू झाला ... by मुक्त विहारि

Permalink

कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा

कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा धागा काढावा. दिशाभुल करणार्या टायटलसाठी कवींचा निषेध. 👎
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sat, 09/17/2022 - 15:39

In reply to कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा by ॲबसेंट माइंडेड…

Permalink

निषेधाचा निषेध...

कवितेद्वारे कट्ट्यावर येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. कट्टा संपन्न झाला ,वृतांत व सहभागी सदस्यांचे प्रतीसाद ,लवकरच छायाचित्रासह वेगळा धागा प्रकाशीत होणार आहे. कट्टा आयोजित करण्यात पाभे यांनी पुढाकार घेतला व शक्य असलेल्या सदस्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला या बद्दल सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 09/17/2022 - 14:31

Permalink

छान कविता आहे.

छान कविता आहे. लिहीत रहा. कट्टा आपल्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपीन सुरेश सांगळे on Sat, 09/17/2022 - 21:59

Permalink

लगे राहो कर्नलजी !

लगे राहो कर्नलजी !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4671 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com