✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

#तू म्हणालास

प — प्राची अश्विनी, Mon, 05/16/2022 - 19:10
#तूम्हणालास तू म्हणालास "सवय लावून घेऊ नये" "मन बिघडू देऊ नये, उगा जीव लाऊ नये." पण "नये नये" चा पाढा कधी अर्ध्यावरती चुकतोच ना? मुकाट्यानं त्याचे परिणाम भोगत आपण असतोच ना? कित्ती दिवसांत भेट सोडा, एक साधा शब्द नाही. कुणी वेडं वेड्या सारखं वेडी वाट बघतंच ना? "कामात व्यस्त" पटतं, "अपेक्षा चूक" कळतं. पण मोबाईल हातामध्ये रोज घेऊन बसतंच ना? मगं कुणी ठरवतं, आता मात्र बदलायचंच. वेडेपणा सोडून आता शहाण्यासारखं वागायचंच. यापुढे आपणहून बोलायला कधी जायचंच नाही. समोरसमोर (समजा) आलोच तरी भेटायचं तर नाहीच नाही. हो नाही च्या पुढे गाडी कधी न्यायचीच नाही एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू! असूदे का डोळ्यामध्ये आषाढातले मेघ घनु! एक दिवस जमेलच. लत सुद्धा सुटेलच. ... असं छान चालू असतं, इतक्यात काय होतं, मोबाईलच्या स्क्रीनवर एक नाव येतं. "नाही म्हणजे नाही, फोन मुळीच घ्यायचा नाही", मन याद देतं. पण कुठतरी आत आत गाणं वाजू लागतं, "एक आदतसी बन गये हो तुम एक आदतसी बन गये हो तुम.. और आदत कभी नही जाती.." ( ये ज़ुबाँ हमसे सी नहीं जाती ज़िन्दगी है कि जी नहीं जाती .... एक आदत-सी बन गई है तू और आदत कभी नहीं जाती ही दुष्यंतकुमारची एक फार सुंदर कविता आहे)

प्रतिक्रिया द्या
2038 वाचन

💬 प्रतिसाद (4)

सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/20/2022 - 11:29 नवीन
मस्त. आवडलं.
आपणहून बोलायला कधी जायचंच नाही.
हे तर पाच पन्नास हजार वेळा ठरवून झालेलं असतं. काही नसतं. ठाम राहताच येत नै. सर्व 'पण' क्षणात मोडून जातात.
एक आदतसी बन गये हो तुम.. और आदत कभी नही जाती..
विषयच संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एकदा ठरलं म्हणजे ठरलं,

श्रीगणेशा
Fri, 05/27/2022 - 08:17 नवीन
एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू! असूदे का डोळ्यामध्ये आषाढातले मेघ घनु!
खरं आहे! छान लिहिलंय!!
  • Log in or register to post comments

नेहमी सारखंच. अप्रतीम! :-)

राघव
Fri, 05/27/2022 - 22:22 नवीन
नेहमी सारखंच. अप्रतीम! :-)
  • Log in or register to post comments

@बिरुटे सर, श्रीगणेशा आणि

प्राची अश्विनी
Sat, 09/24/2022 - 08:09 नवीन
@बिरुटे सर, श्रीगणेशा आणि राघवा, खूप धन्यवाद! प्रतिसाद द्ययला कायच्या काय उशीर झाला. त्यासाठी सॉरी __/\__
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा