बेतुक्याचे चर्हाट.....
- Read more about बेतुक्याचे चर्हाट.....
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2396 views
एक वर्षापुर्वी वळलेले चर्हाट......
https://misalpav.com/node/51141
आता पुढे.
K-जरी चंचल,चपळ मासोळी
लावली जाळी, तरी न लागे गळी
खेळतसे जळी, धीवरा संगे
खेळतसे रडीचा डाव
धीवरा न देतसे भाव
आता करू काय उपाव
धिवर म्हणे....
धीवरे घातले साकडे
वाचून आकडे, प्रार्थना केली
मिटला संदेह,सुटला आदेश
वाढले बळ, हलले दळ
सत्वर पातले धीवर
यमुना जळी
खेळ रंगला यमुनातीरी
"रापण", करण्या फेकली जाळी
ओढला किनारी K-जरी,लीलया
शक्ती अपरंपार, धीवरा माजी
न लागे पार जैसा ठाव जळापरी
बेतुक्या म्हणे,
-बेतुक्या राॅक्स.