प्रेमम !
आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर प्रेम केलेलं असते. भले यशस्वी होवो अथवा न होवो त्यासाठी आपल्या हृदयात एक कायम हळवा कोपरा राखीव असतो. तुमचं प्रेम यशस्वी असलं तर क्या बात असते, नाहीतर ती कायम कुरवाळत ठेवावी अशी हवीहवीशी जखम असते. प्रेमाला जसं जातपात, भाषा, धर्म यांचं बंधन नसते तसंच चित्रपटाचं सुद्धा असतं. एखादा चित्रपट समजण्यासाठी शब्द महत्वाचे नसतात तर महत्वाच्या असतात त्यात व्यक्त केलेल्या भावना, त्या जर तुम्हांला आपल्याशा वाटल्या तो चित्रपट सुद्धा आपला वाटतो.