(गळवे)

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
14 Apr 2019 - 9:59 am

पेरणा अर्थात

हिच ती जीवघेणी ठणकणारी गळवे
ज्यावर तू हळूवार पणे मलम लावलेस!!

थोडीशी हिंमत असती तर
ही गळवे सुईने फोडून
आतला पस काढून
स्वच्छ पुसून टाकले असते...

ना हा ठणका राहीलां असता...
ना कूठे गेल्यावर हळूवार पणे
कमीत कमी दुखेल असे पहात
बसावे लागले असते....
ना त्याच्यावर माशा भिरभिरत राहिल्या असत्या....

पहा ना,
माझ्या ठणकणार्‍या गळवांना
फोडून टाकण्याची शक्ती घटकाभर दिली,
तर विधात्याचे काय जाते?

पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रेमकाव्यऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Apr 2019 - 10:39 am | यशोधरा

यक्क!!! =))

प्रचेतस's picture

14 Apr 2019 - 11:01 am | प्रचेतस

पैजारबुवा _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2019 - 11:09 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

पाषाणभेद's picture

14 Apr 2019 - 12:51 pm | पाषाणभेद

हेच समजले.

अन लईच खतरनाक विषय सुचला आहे. पण येथे टाकता येणार नाही.

नावातकायआहे's picture

14 Apr 2019 - 1:52 pm | नावातकायआहे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2019 - 1:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वतंत्र कविता म्हणून वाचली. आता मुळ प्रेरणा वाचणे आले.

-दिलीप बिरुटे

सोन्या बागलाणकर's picture

15 Apr 2019 - 4:14 am | सोन्या बागलाणकर

मूळ कवितेत नाही इतका दर्द तुमच्या विडंबनात आहे, पैजारबुवा.
अगदी सुईसारखी टोचली ही कविता =)))

एक नंबर झालीय पैंबू काका .. आवडेश आवडेश आवडेश

शब्दानुज's picture

15 Apr 2019 - 6:44 pm | शब्दानुज

पैजारबुवांना 'विडंबनाधिश' असा किताब द्यावा ही जोरदार शिफारस आम्ही करत आहोत.

अभ्या..'s picture

15 Apr 2019 - 6:58 pm | अभ्या..

माऊली विडंबारिष्टाची फॅक्ट्रीच चालवतात जनू...

मार्कस ऑरेलियस's picture

15 Apr 2019 - 7:28 pm | मार्कस ऑरेलियस

वाह !!

ओल्या पिपात मेले होते ऊंदीर सोळा नंतर इतकी अभिजात बीभत्स रसातील कविता झालेली नाही हे नमुद करु इछितो !!

आणि कविता विडंबनाच्या निमित्ताने मिपावर खेळीमेळीचे वातावरण परत असल्याचे पाहुन विशेष आनंद होत आहे हेही जाहीर करत आहे !
!

पुणेकर भामटा's picture

15 Apr 2019 - 11:13 pm | पुणेकर भामटा

गळवे धन्य जाहली! __/\__

हरवलेला's picture

16 Apr 2019 - 6:51 am | हरवलेला

तळव्यांपेक्षा गळवं भारी !