बिज्जी लेखिकेची आळवणी
लेखनविषय:
(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!)
बिज्जी लेखिकेला
असे घाई भारी
मिटिंगा लई
सुप्रभाती, दुपारी
बिज्जी लेखिका ती
भुसनळी पेटलेली
कुणी त्रास देता
ठासते आग 'खाली'
स्वयंपाकही तो
पाचवीं पूजलेला
शिव्या मोजिते
पाहता ती घड्याळा
तिची नाटिका जी
प्रेक्षकां झालि प्यारी
सदोदीत टाळ्या
फुल्ल तिकिटांचि बारी
प्रयोगास येती
मोठमोठे असामी
पाहता लेखिकेला
'मुग्ध' होती प्रणामी
फोनावर फोन
'मागणी' घालणारे
(टीप: प्रयोगाची मागणी. कृपया नसते तर्क नकोत)
'समोरासमोर
बोलणी' मागणारे
अशी लेखिका
गावची "ष्टार" झाली
अम्हा कोण पुसतो,
अम्हा कोण वाली?
अगे लेखिके गो
जरा टाक दृष्टी
मेशेजांनी भरली
तुझी फोन-सृष्टी
विलंबास करती
उत्तरे ती अताशा
प्रतीक्षा न संपे
बुडू जाय आशा
पुसावे तिला "का?"
तर रागास येई
"मला कार्य सत्रा"
हे सुनवून जाई
अम्हा टाकुनी
दूरशा भूतकाळी
उडे लेखिका
तीन लोकी, त्रिकाळी
वाचने
5275
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
ढेर सारी कवकविताए।
हुश्श!
हे नक्की कोणाबद्दल आहे? कळेल
In reply to हे नक्की कोणाबद्दल आहे? कळेल by इरामयी
माफ करा
अल्फ्रेड हिचकाॅक ऊर्फ जाॅनी वाॅकर
:)
त्यात काय विशेष? मिपावरचं
In reply to त्यात काय विशेष? मिपावरचं by तमराज किल्विष
प्रयत्नांचे स्वागतच