रिलस्टार
--------------------------------------------------------------------------------------------------------------
मला सोफ्यावर पडून लोळायला जाम आवडतं. मागे एक उशी घेतली की झालंच. मोबाईल बघावा.रिल्स पहावेत. मजा ! मध्येच डुलकी लागली तर बहार !
मी अशीच रिल्स बघत होते.एकामागे एक रिल्सची लाईनच असते. तुम्हाला वेगळं काय सांगायचं म्हणा त्यात. बघतच रहावंसं वाटतं. अक्षयपात्रच जणू. त्या आभासी जगात हरवून जायला होतं.
तुम्हीच बघा ना - सध्या ज्या काही घडामोडी आपल्याला स्क्रिनवर, कुठल्याही प्रकारच्या स्क्रिनवर पहायला मिळतात, त्या मला मसाल्यांच्या जाहिराती वाटतात.
र्हदयस्पर्शी.
ही खदखद होती मनात थोडी थोडी या जगण्याला ना गावाकडची गोडी