Skip to main content

रासपुतीन ते पुतीन (ऐसी अक्षरे -२३)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 30/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
रासपुतीन ते पुतीन - लेखक-पंकज कालुवाला २ आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले.

मौनी कुंभ

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 30/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मोक्षाची ती घाई, संगम त्रिवेणी नेई, मौनी डूबकी देही, अमृतस्नान ।। नेत्यांचे स्नान, गर्दी ही बेभान, गमावले प्राण, निष्पाप तीस ।। सर्वा तीच वेळ, मग तोच खेळ, कसा करील मेळ, प्रशासन ।। मौनी अमावस्या, मोक्षाची समस्या, कीव आली मत्स्या, तैरतांना।।

बनेश्वर मंदिर (तळेगाव दाभाडे) भटकंती

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 29/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मॉल मधली थोडीफार खरेदी संपल्यानंतर बाहेर पडताना मोबाईल वाजला बघितला बघितला तर बबनचा फोन. घाईत होतो, त्यामुळे प्रश्न पडला फोन घ्यावा की नाही. पण मग घेतला फोन. उत्तरलो " मार्केट मध्ये शॉपिंगच्या गडबडीत आहे. घरी गेल्यावर फोन करतो " बबन म्हणजे माझा जुना दोस्त. गेल्या अनेक वर्षाचा सहवास. आमचं बोलणं सुरू झालं की खूप वेळ चालायचं.. म्हणजे एक तासाच्या वरच. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा रंगायच्या. शॉपिंग आटोपून घरी गेल्यावर त्याला फोन केला. बबन : अरे... काय, कुठे आहेस तू ? बबनचं असंच आहे.

हिरकमहोत्सवाची सांगता..

लेखक आजी यांनी बुधवार, 29/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शाळेचा हिरकमहोत्सव होता. मला निमंत्रण आलं होतं ते बघून मला खूप आनंद झाला. कुणाकडून तरी माझा व्हाॅटस्ॲप नंबर मिळवून शाळेच्या निमंत्रण विभागाच्या कोऑर्डिनेटरांनी मला हिरकमहोत्सव सोहळ्याला बोलावलं होतं. माझी शाळेची वर्षं म्हणजे पाचवी ते अकरावी इयत्तेपर्यंतची वर्षं. एकूण सात वर्षं मी त्याच शाळेत शिकत होते. शाळेची आठवण मला मी इतकी मोठी झाले तरी अधुनमधून यायची. पण हे निमंत्रण पाहून ती तीव्रतेनं आली. माझी शाळेतली वर्षं फार चांगली गेली होती. सगळे शिक्षक चांगले होते. मला त्या शाळेत कधीही, कुठलीही शिक्षा झाली नाही. माझ्या शाळेबद्दलच्या आठवणी मधुर होत्या. शाळेत एक पाण्याची टाकी होती.

कल्पकता

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 28/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे... ============= कल्पकता ====== माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं).

Lessons in Chemistry!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 28/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे. सुरुवातीला तिच्या पात्रात एक टिपिकल आढ्यता जाणवते. थोडा एकसुरीपणा सुद्धा वाटू शकतो. पण हळू हळू कथेसोबत तिचा अभिनय पण उलगडू लागतो.एका चांगल्या कादंबरी चे रूपांतर असल्यामुळे कथा छान आहेच, पण सगळ्यात जास्त मला काही संवाद आणि पंच लाईन्स खूप आवडल्या.

हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 26/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ... तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का? आजकालच्या डिजिटल युगात ह्या प्रश्नांची उत्तरे बहुतांश 'नाही' अशीच असतील. पेन वापरून कागदावर लिहिण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. फार तर थोडे scribbling करत असाल. एव्हढेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी स्वाक्षरीची देखील गरज उरलेली नाही. PIN आणि OTP किंवा कॉन्टॅक्टलेस पद्धत वापरून सर्वत्र व्यवहार होत असताना धनादेशांवर स्वाक्षरी करण्याची वेळ फारशी येत नसेल.

कोष

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 25/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे | अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात. पुर्वी नात्यांच्या ईकोसिस्टीममुळे नैराश्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जात. आता नात्यांची वीण बदलली आहे. आता ही नात्यांची इको सिस्टीम मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा सेक्टर मधे गेली आहे. अर्थात आताच्य सेवा या सेवा नसून तो व्यवसाय असतो.

मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

लेखक Bhakti यांनी शनिवार, 25/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड! आ मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पह

प्लॅनेटरी अलाईनमेंट: सोशल मीडियाची कमाल!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 25/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सतत एक मॅसेज व्हायरल होतोय की, २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेमध्ये येणार आहेत, खूप अभूतपूर्व दृश्य असेल वगैरे. काही वेळेस तर त्याचे फोटोज- व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. अनेक जणांना त्यावर उत्तर दिल्यानंतर शेवटी हे लिहावसं वाटलं. वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी तो कंटेंट बनवणार्‍यांचं खरंच कौतुक! अगदी सगळीकडे तो मॅसेज गेलेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपर्यंतही! भले तो मॅसेज चुकीचा असला तरी त्या निमित्ताने लोक आकाश बघणार आहेत, ग्रह शोधणार आहेत, हेही नसे थोडके!