Skip to main content

रिलस्टार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 03/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
रिलस्टार -------------------------------------------------------------------------------------------------------------- मला सोफ्यावर पडून लोळायला जाम आवडतं. मागे एक उशी घेतली की झालंच. मोबाईल बघावा.रिल्स पहावेत. मजा ! मध्येच डुलकी लागली तर बहार ! मी अशीच रिल्स बघत होते.एकामागे एक रिल्सची लाईनच असते. तुम्हाला वेगळं काय सांगायचं म्हणा त्यात. बघतच रहावंसं वाटतं. अक्षयपात्रच जणू. त्या आभासी जगात हरवून जायला होतं. तुम्हीच बघा ना - सध्या ज्या काही घडामोडी आपल्याला स्क्रिनवर, कुठल्याही प्रकारच्या स्क्रिनवर पहायला मिळतात, त्या मला मसाल्यांच्या जाहिराती वाटतात.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

लेखक वेडा बेडूक यांनी बुधवार, 01/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटूंबाने आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं होतं.

चपाती आंदोलनाचे गूढ

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 01/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
chapati आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का? "चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का? १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का? आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले? चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याल

आवळ्याचा छुंदा

लेखक Bhakti यांनी सोमवार, 30/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला. अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे. आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व

शब्दांचा अचपळ पारा

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेच्या वाटेवरती कधी झुलतो मोरपिसारा मोहवितो पांथस्थांच्या पाणवल्या, दिपल्या नजरा कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक कवितेच्या वाटेवरती अर्थाचा वर्ख निखळतो शब्दांचा अचपळ पारा वाटेवर विखरुनी जातो

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग ४ : परतीच्या प्रवासातील मंदिरे आणि कॅसिनो

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 30/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ आज भटकंतीचा चवथा दिवस . तीन दिवस होऊन गेले, अनेक किनारे पाहिले तरी अजून समुद्राच्या पाण्यात डुंबायचे बाकीच होते .

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १० (देवबाग, तारकर्ली, वालावल)

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 27/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
.mi-container img {box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);} .mi-container p {text-align:justify;}

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 27/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.

समुद्रपुष्प

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 26/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या सकाळी, जवळपास निर्मनुष्य अशा समुद्रकिनाऱ्यावर, ओलेत्या वाळुवर हळुवार पावलं उमटवताना, रात्रीच्या उधाण लाटांनी पुळणीवर दूरपर्यंत रेखाटलेल्या धुकट काळ्या - पांढऱ्या छटांच्या नागमोडी रांगोळीच्या पार्श्वभुमीवर ऐकू येणारी सिंधुसागराची धीरगंभीर गाज मनावर गारुड करते. इटूकल्या नखाएवढ्या खेकड्यांच्या पिटुकल्या बिळांबाहेरची कलाकुसर व त्यांच्या तिरक्या चालीने भोवताली आपसुकचं रेखाटली गेलेली नक्षी पाहताना नजर एका ठिकाणी मुळी ठरतचं नाही.

​आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 26/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रेलवेच्या आठवणी असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो... भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.) गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती... दोन दिवसानंतर दिवाळी होती. म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती... आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती...