मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.

"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला. माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत.

काही चुका, काही विसंगती..

आजी ·
लेखनविषय:
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो. विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं. प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या.

तीळगुळ वड्या

Bhakti ·
क निसर्गाची रंगसंगती जिभेची रसना पूर्ण करते.तिळ खोबरं वाटण्याच्या खमंग स्निगधतेत गाजराची,हरबऱ्याच्या दाण्याची मऊसर चवं रेंगाळत राहते....चांगले भोग म्हणुन बाकी काय भोगीची भाजी खायला मिळते. बरोबरीने तीळ गुळाची वडी चाखतांना एखादा इलायची एक दाणा बक्षीस जिंकल्यासारखा वाटत राहतो तीळगुळ वड्या दोन वाटी भ

जॉन अब्राहम (भाग २)

श्रीगुरुजी ·
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) (त्याने अचानक ०.४४ कॅलिबर डेरिंजर पिस्तुलाने लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले . . . ) . . . _______________________________________________________________________________________________

१४ एप्रिल १८६५, वेळ सायंकाळी अंदाजे १०:२० वाजता

प्रेक्षकातील काही डॉक्टरांनी लिंकनवर प्राथमिक उपचार करण्याचा तात्काळ प्रयत्न केला.

आभास हा....

नूतन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ इंग्रजी लेखक विल्यम एस गिल्बर्ट यांच्या अँजेला- ॲन इन्व्हर्टेड लव स्टोरी ‌या कथेचा भावानुवाद ] मी एक चित्रकार आहे. गेली अनेक वर्षे पक्षाघातामुळे मी अंथरुणाला खिळलेला एक रुग्ण आहे. मी खुर्चीत बसू शकतो, पण कुणाच्या तरी मदतीनेच. . तसा मी मूळचा इंग्लिश पण आज गेली सहा वर्षं, व्हेनिस कालव्या जवळच्या एका इमारतीमधील एका लहानशा खोलीत मी वास्तव्य करतो आहे, एकटाच ! नाही नाही.... कानानं अधू असलेली एक वृद्धा माझ्यासोबत इथे राहते. ती मला जेऊ घालते .माझं अंथरुण घालते . थोडक्यात माझी सेवा करते. आणि माझ्या भरण पोषणाचं काय? सांगतो ,सांगतो. मी आधी म्हटलंच आहे की मी एक चित्रकार आहे.

गाव सोडले होते

किरण कुमार ·
लेखनविषय:
बिनधास्त उभा तो वाडा हळहळणारा वर पिंपळ थकला तेथे सळसळणारा ते जळमट काही प्रवेशद्वारापाशी तृण उंच वाढले बिलगे तरु पर्णांशी पोपडे जरासे भिंतीवरती ओले अन धाप टाकुनी उदास खिडकी बोले निखळले कसे हे अलगद वासे काही ते वैभव सारे जिथे द्यायचे ग्वाही ती विहीर जेथे जमायचे बघ खेडे वाजायाचे ते रहाट करकर वेडे देव्हारा तिथला कसा पोरका झाला चढविली कशी ना कुणी फुलांची माला मी धावत सुटलो स्वप्नांच्या त्या पाठी ना मिटली तरिही चिंतेची ती आठी बैसतो स्मृतीच्या त्याच नदीच्या काठी मी बालपणाला पुन्हा जगायासाठी का आता कोणी तेथे फिरकत नाही थांबला काळ जो पुढती सरकत नाही ते काळ स्मृतींचे किती लो

रॉय २ - सेरो तोरे

किल्लेदार ·
रॉय १ प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मेलरीला एकदा एका पत्रकाराने प्रश्न केला, "व्हाय क्लाइंब माऊंट एव्हरेस्ट ?” त्यावर तो चटकन् उत्तरला, "बिकॉज इट इज देअर!” त्याच ढंगात जर मला विचारलं की का रे बाबा अर्जेंटिनाला का जावं तर मीही लगेच म्हणेन “तिथे रॉय आहे म्हणून!” अर्थात कुणी पत्रकार असं मला विचारणार नाही आणि काही वदलो तर ते प्रसिद्धीही पावणार नाही. पण अर्जेंटिनाच्या इतक्या कोपऱ्यात रॉयच मला ओढून घेऊन गेला होता एवढं मात्र खरं. अर्जेंटिनाच्या, खरंतर जगाच्याच या कोपऱ्यात पहाटेचे सहा वाजले होते. अजूनही पुरतं उजाडलं नव्हतं.

दुधवा अभयारण्यात सफर आणि व्याघ्रदर्शन

अनुप कोहळे ·
माझ्या पुणे ते आयोध्या (नोव्हेंबर 2024) सायकलवारीनंतर मला उत्तर भारतात असलेल्या लखनौ जवळील दुधवा नॅशनल पार्क ह्या वन्यजीव अभयारण्यात सफारी करण्याचा योग जुळून आला. तेथे आम्हाला वाघ आणि इतर वन्यजीव हिवाळ्याच्या सुंदर सॉफ्ट लाईट मध्ये फोटोग्राफी करायची छान संधी होती. दुधवा चे जंगल हे हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे फार उंच आणि भव्य झाडांनी नटलेले आहे. ह्या जंगलाला तुराईचे जंगल असेही म्हणतात. या जंगलात मुख्यत्वे करून वाघ आणि हत्ती यांचे वास्तव्य आहे. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तापमान फार कमी म्हणजे 5 ते 19 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाते.

आंतरजालीय थरार.! भाग १

भागो ·
लेखनविषय:
The Internet can be a dangerous place! काही दिवसांपूर्वी माझा संगणक दारू प्यालेल्या माणसासारखा वागायला लागला. यावर खरा इलाज असा होता कि माझ्या एका तज्ज्ञ मित्राकडे जाऊन त्याच्याकडे संगणक पटकून द्यायचा. त्याऐवजी मी माझे डोके चालवायचा प्रयत्न केला. माझ्या मनाने असे ठरवले कि माझ्या RAM मध्ये काही तरी लोच्या झालेला आहे. RAM कमी पडतो आहे. त्यामुळे साधी .docx फाईल लोड करायलाही संगणकाची दमछाक होतेय. मग शोध सुरु झाला अशा चाळणीचा कि ज्याच्या साठी अत्यंत कमी RAMची आवश्यकता लागेल. ह्या शोधात माझ्या हाती काय काय रत्ने घावली हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.