विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, 'काळ ही चौथी मिती आहे आणि ती सापेक्ष आहे' असे धक्कादायक प्रतिपादन करुन संपूर्ण जगाला हादरविणार्या महान वैज्ञानिकाचे, अल्बर्ट आईनस्टाइनचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन इस्पितळात निधन झाले आणि वैज्ञानिक जगतातला एक महान तारा चौथ्या मितीतून लुप्त झाला!
तो एक महान शास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच तो मानवी आयुष्याचा साक्षेपाने वेध घेणारा विचारवंत, माणसाचे अस्तित्व नक्की कशासाठी आहे ह्याचा शोध घेणारा तत्वज्ञ, एक सहृदय मानवतावादीही होता.
शास्त्रातल्या अनेकविध शोधांप्रमाणेच विचारांचेही अनेक मौलिक स्फटिक त्याने त्याच्या आयुष्यात वेचले.
छानच !
अप्रतिम!!!
आवडली
सुख-दु:ख्खाचे वाटेकरी-
छान आहे
सुरेख..