मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रियांकाप्रमाणेच तिच्याजागी इतर कोणा "अ-गांधीला", इतर पक्षियास "नलीनी भेटी" सारख्या प्रसंगासाठी सुप्रसिद्धी मिळाली असती का?

विकास · · कौल

वाचने 1042 वाचनखूण प्रतिक्रिया 17

बगाराम Sat, 04/19/2008 - 03:42
माझ्या मते नाही. कारण नलिनी ने प्रियांकाच्या वडीलांचा खून केला आहे त्यामूळे बाकिच्या कुणाची नलिनीशी भेट आणि प्रियांकाची भेट ह्यांची तुलनाच काय होऊ शकत नाही. -बगाराम

In reply to by बगाराम

विकास Sat, 04/19/2008 - 03:56
नलीनी भेटी" सारख्या प्रसंगासाठी याचा अर्थ जर असाच प्रकार स्वत:च्या नातलगांबाबत झालेला असताना त्या खुन्यास/कटात सामील असलेल्यास जाऊन जर इतर कुठल्या राजकीय पक्षातील व्यक्ती भेटली तर प्रसिद्धी मिळेल का. (थोडक्यात प्रियांका आणि नलीनी ही पात्रे वेगळी असतील पण प्रसंग सारखा असेल तर).

अनामिका Sat, 04/19/2008 - 12:08
विकास ! अशी प्रसिद्धी फक्त " गांधी " आडनाव धारण करण्यात आणि प्रसारमाध्यमांची दिशाभुल करण्यात जर सदरचे नातलग यशस्वी झाले तरच शक्य! इतर कुणाला या देशात संवेदना आहेतच कुठे? ती फक्त आणि फक्त "गांधी "घराण्याची मक्तेदारी आहे. बा़की आपल्या देशातील जनता संवेदनाहीन आणि जगायला नालायकच ठरत आहेत नाही का? ("गांधी " घराण्याबद्दल कुठल्याही प्रकारची अनुकंपा नसलेली!) (किशोरदांच्या गाण्यातली ) "अनामिका"

प्राजु Sat, 07/19/2008 - 07:16
नाहीच.. मुख्य म्हणजे, माझ्या वडिलांना का मारले हा प्रश्न विचारायले जाण्यासाठी ती एखादी "अ गांधी" धजावली असती की नाही कोण जाणे?? प्रियांकासोबत पूर्ण पोलिस फोर्स आणि राजकीय पाठिंबा असल्याने ती गेली... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं Sat, 07/19/2008 - 09:10
आजच्या न्युज चॅनल्सचा धिंगाणा बघता (उदा: कमिशनरचा कुत्रा बेपत्ता, जंगल मे ट्रेंगल [वाघ आणि वाघिणीची प्रेमकथा], अमिताभ बच्चन को ठंड लगी, इत्यादि ) तिला कोणीही भेटायला गेलं असतं तरी त्याची "ब्रेकिंग न्युज" झाली असती. http://sucheltas.blogspot.com

उत्तर नाही असे आहे.
प्रियांकासोबत पूर्ण पोलिस फोर्स आणि राजकीय पाठिंबा असल्याने ती गेली...
प्राजु शी सहमत प्रकाश घाटपांडे

अमित.कुलकर्णी गुरुवार, 08/14/2008 - 01:45
पूनम महाजन जर प्रवीण महाजनांना भेटायला तुरुंगात गेली तर त्या घटनेलाही बरीच प्रसिद्धी मिळू शकेल. -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

अमित.कुलकर्णी गुरुवार, 08/14/2008 - 21:45
इतर पक्षीय - अ-गांधी उदाहरण दिले आहे यावरून शिरीष कणेकरांच्या चालीवर एक वाक्य असे सुचले आहे - "प्रियांका ने केला तो 'चीप पब्लिसिटी स्टंट', पूनमने दाखवली ती संवेदनाशीलता !" -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

विकास Fri, 08/15/2008 - 02:45
यावरून शिरीष कणेकरांच्या चालीवर एक वाक्य असे सुचले आहे - "प्रियांका ने केला तो 'चीप पब्लिसिटी स्टंट', पूनमने दाखवली ती संवेदनाशीलता !" सर्वप्रथम पूनमच्या बाबतीत असे काही झाले आहे का? उगाच काहीही! असे कुठे म्हणलयं? मी प्रियांकाने "चीप" जाउंदेत पण "पब्लिसिटी स्टंट" केला असे देखील म्हणलेले नाही. हा प्रश्न माध्यमे कसा हाताळतील या संदर्भात प्रत्येकास काय वाटते ह्या संबंधाचा कौल घेताना विचारला होता. त्याला उत्तरे ही पक्षाधारीत नव्हती तर माध्यमांचे जे एकंदरीत वर्तन असते त्या संबंधातील होती. तुम्हाला कौलामधे फक्त "होय", "नाही", "माहीत नाही" यातील एक उत्तर सुचवायला सांगितले होते. "हा चीप पब्लीसिटी स्टंट आहे", "हा चीप पब्लीसिटी स्टंट नाही" अथवा " हा चीप पब्लीसिटी स्टंट आहे का ते माहीत नाही"असले पर्याय दिले नव्हते... प्रतिसाद देताना उगाच चष्मे वापरायची गरज नाही इतकेच म्हणावेसे वाटते....

हर्षद आनंदी गुरुवार, 08/14/2008 - 08:40
मै क्या करू प्रियांका, तेरे बाप का मैने खुन किया !!! एका गांधीचा खुन झाला आणि बामणांची पळता भुई थोडी झाली. [जो होणे गरजेचे होते] देशाला एका नविन उंचीवर नेण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याच्या खुनाचा इथे राजकीय स्टंट चालु आहे, काळाचा महीमा आणखी कय? प्रसिध्दी मिळ्णारच कारण प्रत्येक न्युज चॅनल कुणा ना कुणाचा अघोषित प्रचार करत असते || निर्लज्जम् सदा सुखी ||

मराठी_माणूस गुरुवार, 08/14/2008 - 08:50
एका गांधीचा खुन झाला आणि बामणांची पळता भुई थोडी झाली. [जो होणे गरजेचे होते] ह्याचा ह्या कौलाशि काय संबंध ?

In reply to by मराठी_माणूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/14/2008 - 09:31
ह्याचा ह्या कौलाशि काय संबंध ?
कौलाशी संबंध नाही पण अशा लिहिण्यातुन मानसिकता दिसुन येते. प्रकाश घाटपांडे