धर्म आणि संयुक्त राष्ट्रसंघ
आज पोप बेनेडीक्ट न्यू यॉर्कमधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) मुख्यालयात गेले होते आणि सार्वजनीक भाषण केले. त्यांची ओळख करून देताना युएन सरचिटणीस बान की मुन यांनी कॅथलीक चर्च आणि युएन मधे साम्य आहे असे सांगीतले (सेवा या अर्थी). स्वतः पोप हे मानवी अधिकारांवर बोलत असताना " धार्मिक हक्कांबद्दल" पण बोलले. यात कोणी फार गैर बोलले असे वाटले नाही. पण एक प्रश्न नक्कीच पडला की असे इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का? आज कॅथलीक सिस्टीम (मी सिस्टीम मुद्दाम म्हणत आहे कारण यात धर्मापेक्षा, धर्माधारीत इतरांवर राज्य करणे जास्त उर्धृत आहे)ही अफ्रिका आणि आशियाकडे नजर लावून आहे. कारण युरोपात त्यांची चर्चे ओसाड पडत आहेत आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे. असे आधि पण बघितले आहे आणि तेही विशेष करून हिंदूं/बुध्दीस्टांना बाजूस ठेवण्याचे प्रकार पाहीला आहे...
पण आजचा प्रकार पाहताना, एकंदरीत असे फक्त एकाच धर्माला आणि त्यातीलही एकाच पंथाच्या धर्मगुरूला संपुर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणार्या संस्थेने महत्व देणे हे अयोग्य वाटले. यात अजून एक गंमत म्हणजे रीडीफ ने मोठी बातमी या संदर्भात दिली आहे. ते ठीक आहे. पण गेल्या आठवड्यात पंतप्रधान मनमोहनसिंगना युएन कडून विशेष पारीतोषीक शेतीनिमित्त मिळाले त्याची बातमी पण नाही...
आपल्याला काय वाटले ते समजून घेयला आवडेल.
वाचने
4759
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
यूएन
पोपचे भाषण!
In reply to पोपचे भाषण! by पिवळा डांबिस
सहमत आहे
In reply to पोपचे भाषण! by पिवळा डांबिस
सत्यासत्यता
In reply to सत्यासत्यता by विकास
अहो डँबिस
In reply to अहो डँबिस by पिवळा डांबिस
धन्यवाद + स्पष्टीकरण
आश्चर्य वाटते !!!
In reply to आश्चर्य वाटते !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मान्य
एक शंका आहे
In reply to एक शंका आहे by विजुभाऊ
सर्वधर्म परीषद