सापेक्षतावादाच्या जनकाची ५३ वी पुण्यतिथी!
लेखनप्रकार
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, 'काळ ही चौथी मिती आहे आणि ती सापेक्ष आहे' असे धक्कादायक प्रतिपादन करुन संपूर्ण जगाला हादरविणार्या महान वैज्ञानिकाचे, अल्बर्ट आईनस्टाइनचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन इस्पितळात निधन झाले आणि वैज्ञानिक जगतातला एक महान तारा चौथ्या मितीतून लुप्त झाला!
तो एक महान शास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच तो मानवी आयुष्याचा साक्षेपाने वेध घेणारा विचारवंत, माणसाचे अस्तित्व नक्की कशासाठी आहे ह्याचा शोध घेणारा तत्वज्ञ, एक सहृदय मानवतावादीही होता.
शास्त्रातल्या अनेकविध शोधांप्रमाणेच विचारांचेही अनेक मौलिक स्फटिक त्याने त्याच्या आयुष्यात वेचले. "क्वोटेबल आईनस्टाइन" ह्या पुस्तकात त्याची अनेक अवतरणे संग्रहित करुन दिलेली आहेत. फारच वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारचे हे लिखाण आहे. कित्येक अवतरणामधून तर त्याला असलेल्या विनोदाच्या उत्तम जाणिवेचं आपल्याला आकलन होतं आणि आपण चकित होतो!
एके ठिकाणी तो म्हणतो "तरुण असताना मला एकच गोष्ट आयुष्यात हवीशी वाटे ती म्हणजे, लोकांनी माझ्याकडे लक्ष देऊ नये, एखाद्या शांत कोपर्यात मी माझे काम विनाअडथळा करीत बसलेलो आहे. आणि आता इतक्या वर्षांनी माझे काय झाले आहे ते पहा!" ह्यातली खोच लक्षात घेतलीत की आपण डोलतो.
तो एक उत्तम व्हायोलिनवादकही होता. सॅटरडे ईवनिंग पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणून गेलाय "जर मी भौतिकशास्त्रज्ञ झालो नसतो तर मी बहुदा संगीतकार झालो असतो. मी बहुतेक वेळा संगीतातून माझे विचार करतो. माझी दिवास्वप्ने हे एक संगीतच असते. माझे आयुष्यच मी संगीताच्या स्वरुपात बघतो..मला माझ्या आयुष्यात खूप मोठा आनंद संगीतातून मिळतो."
अंतःप्रेरणेच्या अगम्य खेळातून विश्वाची वेगवेगळी रहस्ये उकलण्याची ताकद त्याला अशाप्रकारे संगीतातूनच मिळत असावी काय?
(गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने प्रकाशात होणार्या वक्रीभवनाचा त्याचा सिध्दांत खरा ठरला त्यावेळी त्याचा अमेरिकेत उदोउदो झाला. त्यावेळी तो म्हणाला होता "मी बरोबर आहे म्हणून आज ते मला अमेरिकन म्हणताहेत. जर मी चुकलो असतो तर ते मला जर्मन म्हणाले असते आणि जर्मनांनी हिणवलं असतं की हा तर ज्यू आहे!")
प्रिंस्टन विद्यापीठात त्याने काही काळ अध्यापन आणि संशोधनाचे काम केले. मी तिथे जाऊन त्याच्या काम करण्याच्या जागेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आलोय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार तिथे कोणतंही स्मारक वगैरे केलेलं नाही. त्याची खोली सध्याचे प्रोफेसर वापरत असतात. तिथे फक्त त्याच्या नावाची एक पाटी आहे. मला त्याजागी उगीचच भारल्यासारखं वाटलं. मनात विचार येऊन गेला की ह्याच खोलीत बसून परमतत्वाच्या त्या अंशानं जगाची काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. मानवाच्या कल्याणाबद्दल मौलिक विचार केला असेल.
मानवजातीबद्दल तो म्हणतो. "किरणोत्सारी पदार्थांचे गुणधर्म एकवेळ बदलता येतील पण मानवाच्या मधला आसुरशक्तीचा अंश काढून टाकणं महाकठिण!"
आज आपण त्याच प्रत्यंतर जगात ठायीठायी बघतो आहोत. तेव्हा आपल्यातली आसुरशक्ती थोडी का होईना कमी करणे हीच त्याला वंदना ठरेल.
चतुरंग
(ताजा कलम - उपरोल्लेखित तिरप्या अक्षरात दिलेल्या अवतरणात बदल - सामान्य सापेक्षता सिध्दांत मांडल्यानंतर फ्रान्समधे बोलताना तो म्हणाला होता "माझा सिध्दांत बरोबर आला तर जर्मन मला त्यांचा नागरिक म्हणतील. फ्रान्स घोषित करेल की मी जगाचा नागरिक आहे. आणि मी चुकलो तर फ्रेंच म्हणतील की मी जर्मन आहे आणि जर्मन्स म्हणतील की हा तर ज्यू!")
आधी दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल क्षमस्व.
वाचने
8068
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वंदन
In reply to वंदन by नीलकांत
असेच
अल्बर्ट आईनस्टाइन
या महान शास्त्रज्ञाला माझे अभिवादन.
तीर्थक्षेत्र
रंगा,
लेख आवडला
In reply to लेख आवडला by सुवर्णमयी
असेच
धन्यवाद
खुप छान लेख..
या तत्त्ववेत्त्याला प्रणाम
In reply to या तत्त्ववेत्त्याला प्रणाम by धनंजय
अप्रतिम व्हायोलिन फीत आणि त्यातली प्रसंगोचित माहितीसुध्दा!
सुंदर लेख!
मागच्याच
स्विट्झरलंड्मधील .........
In reply to स्विट्झरलंड्मधील ......... by सुधीर कांदळकर
डिसलेक्सी
In reply to स्विट्झरलंड्मधील ......... by सुधीर कांदळकर
प्राथमिक शाळेत असताना त्याच्या बोलण्यात थोडे दोष होते.
एका .......
प्रासंगिक आणि औचित्यपूर्ण!
थोडक्यात