मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उरून राहता येतं !

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
उरून राहता येतं ! हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं? चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद् मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं ! मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं? कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं ! कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की चुकून आलंच कधी तर्.....सूख पण साहता येतं ! कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं? स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!"

वाचने 3344 वाचनखूण प्रतिक्रिया 6

शितल Sun, 04/20/2008 - 02:47
तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !

स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 21:51
कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...