मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव का आवडते?

सरपंच · · कौल

वाचने 1545 वाचनखूण प्रतिक्रिया 36

धमाल मुलगा Fri, 04/18/2008 - 12:58
इथे मत नोंदवताना कोणताही एकच पर्याय निवडावा लागतो. त्यापेक्षा जास्त नाही! आता माझं उदाहरण घ्या... आधी मी सहजच आलो (पर्याय क.३) अन्य बंधने नसल्यामुळे सहज वावरता येते. (पर्याय क्र.१) हे लक्षात आल्यावर रमलो. आणि इथे येऊन येऊन मिपानं मला जी काही जीवाभावाची माणसं दिली त्यांच्यासाठी म्हणून आता रोजच्या रोजच येतो.. म्हणजेच ओळखीची लोक भरपुर आहेत. (पर्याय क्र.२) इथे मी ३ ही पर्याय स्विकारु इच्छीत होतो. पण ते शक्य नाही. त्याबाबतीत काही करता येइल काय? -(पर्यायांतसुद्धा हावरटपणा करणारा) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Fri, 04/18/2008 - 13:03
हा हा हा, च्यायला धमाल्या काय प्रतिसाद टाकतोस राव, एकदम झप्पर फाड ... बाकी आम्हाला पण ३ पर्याय द्यावे वाटतात पण सध्या शक्य नसल्यामुळे फक्त "१" निवडला आहे... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Fri, 04/18/2008 - 16:54
इथे मत नोंदवताना कोणताही एकच पर्याय निवडावा लागतो. त्यापेक्षा जास्त नाही! सहमत || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी Fri, 04/18/2008 - 16:58
तेच बरोबर आहे. जो सर्वोच्च लागू होत असेल तो निवडावा. अन्यथा मतचाचणी योग्य निकाल दाखविणार नाही, असे मला वाटते.

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 17:20
जो सर्वोच्च लागू होत असेल तो निवडावा. अन्यथा मतचाचणी योग्य निकाल दाखविणार नाही, असे मला वाटते. मनस्वीशी सहमत आहे.... तात्या.

आजानुकर्ण Fri, 04/18/2008 - 13:08
हा प्रश्न मिसळपाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे की मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल??? आपला, (पृच्छक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 13:20
(सर्वसाधारण मराठीत) जर मिसळपाव या खाद्यपदार्थाबद्दल हा प्रश्न असला असता तर मिसळपाव का आवडतो असे विचारले गेले असते, मिसळपाव का आवडते असे शिर्षक असल्यामुळे, तसेच उपलब्ध पर्याय तसेच सुचवित असल्यामुळे सहाजिकच हा प्रश्न संकेतस्थळाबद्दल आहे असे वाटते. अर्थातच हे सगळे सर्वसाधारण प्रचलित मराठीच्या अनुषंगाने !

अविनाश ओगले Fri, 04/18/2008 - 15:31
माझे स्नेही श्री. धोंडोपंत यांनी मला मिसळपावचा पत्ता दिला. मी इथे मनापासून रमलो आहे. इथल्या सर्व मंडळींची नावे भलतीच धमाल आहेत. यांची खरी नावे मला अर्थातच माहित नाहीत. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही. इथली मंडळी ही आपापल्या क्षेत्रातली दादा मंडळी आहेत. एखाद्या विषयावर मत मांडताना किंवा चर्चेत भाग घेतांना त्यांचा त्या विषयावरचा अभ्यास, व्यासंग स्पष्ट जाणवतो. प्रतिकूल मते नोंदवतानाही आपली भूमिका कारणासह स्पष्ट केली जाते. त्यात मी म्हणतो/ म्हणते तेच खरे असा दुराग्रह दिसत नाही. तरी ठामपणा असतोच. केशवसुमारांची विडंबने मला फार आवडतात. विडंबनातली त्यांची शब्दांवरची हुकमत आणि रचनेतली सफाई अप्रतिम. विसोबा, बेसनलाडू, धोंडोपंत व अन्य अनेक मंडळी वाचनीय आहेत. तांत्रिक सुलभता आणि नाविन्याचा ध्यास ही मिपाची खास वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. मिपा माहित नसलेल्या अनेक मंडळीना मी मिपाला भेट द्यायची विनंती करतो. माझी अथवा केशवसुमारांची विडंबने अथवा अन्य काही लेखकांचे काही विशिष्ट लेखन वाचायची विनंती करतो, तेव्हा त्यांना ते कुठे व कसे वाचावे ते कळत नाही. विनंती अशी की शोध मध्ये लेखकाचे नाव टंकल्यानंतर त्याचे सर्व साहित्य एकत्र मिळण्याची सोय असावी. सध्या अशी काही सोय असल्यास कल्पना नाही.... कौलच्या निमित्ताने हे सांगता आले. बरे वाटले.

In reply to by अविनाश ओगले

नीलकांत Fri, 04/18/2008 - 18:00
लेखकाचे सर्व साहित्य शोधता येते. त्या लेखकाच्या नावावर टिचकी मारून त्याच्या पानावर जा. तेथे वाटचाल नावावर टिचकी द्या. त्या सदराखाली त्यांनी प्रकाशित केलेले साहित्य दिलेले असेल. त्यांच्या इतर विषयावर दिलेल्या प्रतिक्रिया आदी शोधायच्या असल्यास शोध मधे जा आणि सदस्य वर टिचकी देऊन शोधा. नीलकांत

सहज Fri, 04/18/2008 - 18:32
दिलेल्या पर्यायांपैकी नाही म्हणले तरी क्रमांक १ पर्याय त्यातल्या त्यात जास्त संयुक्तीक वाटतो. पण त्याच बरोबर "सवय", "ओळखीचे लोक", "मनमोकळेपणे वावर" इ. देखील

स्वाती दिनेश Fri, 04/18/2008 - 18:38
आता पर्याय कोणता निवडायचा तेच समजत नाही ना !सगळीच कारणे आहेतच की.. 'वरील सर्व पर्याय एकत्र 'असा एक पर्यायही द्या सरपंच,:) स्वाती

कलंत्री Fri, 04/18/2008 - 20:43
येथेले सरपंच असलेल्या तात्यामुळे मिसळपावावर यावेसे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही तांत्रीक बाजु नसताना सरपंचानी हे स्थळ उभे केले नव्हे तर चांगलेच चालवले. म्हणूनच या स्थळी जमेल तसे यायला आवडते.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर Sun, 04/20/2008 - 18:15
येथेले सरपंच असलेल्या तात्यामुळे मिसळपावावर यावेसे वाटते. धन्यवाद द्वारकानाथशेठ! असाच लोभ असू द्यावा... बरीचशी मंडळी इथे अगदी भरपूर, मनापासून लिहीत आहेत, त्यांच्याच जोडीने मलाही इथे खूप काही लिहिण्याची इच्छा आहे. संगीतावर, आयुष्यातल्या काही अनुभवांवर, व्यक्तिचित्रांवर, शेयरबाजारावर अगदी भरभरून लिहिण्याची इच्छा आहे. इतरांचंही उत्तमोत्तम ललितलेखन वाचण्याची इच्छा आहे, त्याला भरभरून दाद द्यायची इच्छा आहे. मिपाच्या माध्यमातून चांगली माणसं, जिवाभावाचे मित्र जोडण्याची इच्छा आहे. आपल्यासारख्या मिपाच्या शुभचिंतकांचा असाच आशीर्वाद व लोभ राहिल्यास मिसळपाव डॉट कॉम हे मराठीतलं एक महत्वाचं संकेतस्थळ ठरेल अशी आशा करायला हरकत नाही.. आपला, (मिपाकर सभासदांच्या सहकार्याने मिसळपावचा वेलू गगनावेरी नेण्यास इच्छुक!) तात्या.

ऋषिकेश Fri, 04/18/2008 - 21:50
या स्थळावर यायला मला आवडते :) या स्थळाबद्दल तात्यांचे आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग Fri, 04/18/2008 - 21:56
पण सध्याच्या परिस्थितीत मला सहावा पर्याय "येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात." हाच जास्त भावतो. पर्याय निवडल्यानंतरही मला थोडे भाष्य करावेसे वाटते आहे त्यामुळे मी ते स्वातंत्र्य घेतोय. प्रथमतः हे स्पष्ट करतो की मला इतर कोणत्याही संस्थळावर अवाजवी टीका करायची नाहीये. संदर्भाने जिथे योग्य वाटेल तिथेच मी तसे लिहिले आहे. बर्‍याच मुद्यांचा उहापोह केला तरी थोडेच आहे पण काही मुद्दे तरी ठळकपणाने मांडावे म्हणतो. मि.पा. सोडून मी इतर कोणत्याही मराठी संस्थळाचा सभासद नाहीये. ह्यात काही खास कारण नाहीये, पण 'मराठी संस्थळे' ह्या एकूण प्रकाराशीच माझी ओळख तशी उशिराच झाली आणि त्याची सुरुवात मि.पा.मुळे झाली हे मात्र नमूद करावेसे वाटते. इथे असलेला उत्स्फूर्तपणा भारावून टाकतो हे नक्की. नाटक करताना रंगमंचावर असलेल्या कलाकाराला बर्‍यावाईट प्रतिक्रिया जशा लगेच मिळतात, तसेच इथे चांगले काम असेल तर वाहवा, वाईट असेल तर जाणते व्हा आणि त्याही पुढे जाऊन उठवळी असेल तर चालते व्हा असे तीनही लगेच ऐकायला मिळते!;) एकूणच संस्थळावर वावरताना एकप्रकारचा मोकळेपणा असतो. मी इतर संस्थळावर पाहुणा म्हणून जाऊन येत असतो तिथे प्रत्येक ठिकाणी कोण काय म्हणेल? कोणाला काय रुचेल-न रुचेल? अशा ताणाखाली बर्‍याचवेळा लेखन असते असे मला तरी वाटते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ती गोष्ट का केलीत ह्याबद्दल जर तुम्हाला स्पष्टीकरणच द्यावे लागणार असेल तर त्यातला नैसर्गिकपणा हरवून जातो. आपल्या मनात आलेले विचार कोणाला तरी सांगावेत ह्याची उर्मी जवळजवळ प्रत्येकालाच असते आणि ती विनाअडथळा पूर्ण व्हावी ही अपेक्षाही. अशा वेळी मि.पा. सारखे संस्थळ महत्त्वाचा दुवा ठरते. फुटकळ लिखाण, बेजबाबदार विधाने, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड ही सुरुवातीला होतच असते कारण कोणतीही नवीन गोष्ट करताना चुका होणारच. लेखनातली शिस्त, विषयाच्या निवडीतला वेगळेपणा, मांडणीतला नेमकेपणा, ह्या गोष्टींवर अतिरेकी प्रशासकीय अंकुशाने नियंत्रण आणण्यापेक्षा, कारण त्यात संस्थळाचा आत्मा हरवतो अशी माझी प्रामाणिक धारणा आहे; इथे वावरुन, वेगळे विचार वाचून, प्रतिक्रीया बघून, सभासदांच्या विचारांमधेच हळूहळू योग्य ते बदल होत जातात, ते तसे होऊ देण्याला योग्य वातावरण आणि काळ दिला जातो हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. ह्या सगळ्या प्रक्रियेतून संस्थळाची उंची हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाईल अशी आशा वाटते. त्याचवेळी इथे अतिगंभीर वातावरण निर्माण होणार नाही. 'फक्त वैचारिक लिखाणालाच वाहिलेले' असे ह्या संकेतस्थळाचे स्वरुप होणार नाही ह्याची पुरेशी काळजी आपण सारे जातीने घेऊच ह्याबद्दल मला तरी शंका नाही!:)) चतुरंग

कोलबेर Fri, 04/18/2008 - 22:12
साधारण २-३ वर्षांपूर्वी मनोगतावर सभासद झाल्या झाल्या मी 'ओपिनिअन पोल' सुरू करावा अशी सुचवणी केली होती. त्याकाळी 'मराठी संकेतस्थळ' ह्या तंत्रज्ञानात ते कितपत तशक्य होतं ते माहीत नाही पण नीलकांताने इथे आता ते सुरू केलेले पाहून आनंद झाला. उपक्रमाने सुरू केलेल्या खरडवह्या आणि मिसळपावचा कौल दोन्हीही सुधारणा मराठी पाऊल पुढे टाकणार्‍या आहेत. अभिनंदन!

भाई Fri, 04/18/2008 - 23:13
आवडतो. लोक खूप उत्साही आहेत. आणि सतत काही ना काही ओघ चालू असतो. -भाई

विदेश Sat, 04/19/2008 - 15:48
मी विचारतो की ,का आवडू नये? इथे चांगले काम असेल तर वाहवा, वाईट असेल तर जाणते व्हा आणि त्याही पुढे जाऊन उठवळी असेल तर चालते व्हा असे तीनही लगेच ऐकायला मिळते!;) -म्हणून तर आवडते! शिव्या शिवाय ,मिपा च्या ओसरीवरच्या कौलावर धडपडत पडण्यात-पाडण्यात येणारी खुमारी कांही न्यारीच!

जयवी Sat, 04/19/2008 - 17:44
मिसळपाव हे एक अतिशय जिवंत संकेतस्थळ आहे. त्यामुळे दिवसभरातून एक-दोनदा तरी येऊन डोकवावेसे वाटते.

In reply to by जयवी

ऋषिकेश Sat, 04/19/2008 - 17:48
वा वा!! मिसळपाव हे एक अतिशय जिवंत संकेतस्थळ आहे अगदी बरोबर.. एक वाक्य सारं काहि सांगुन जातं या वाक्यास +++१ -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुधीर कांदळकर Sun, 04/20/2008 - 10:42
कवी लोक कमी शब्दांत कसे शब्दापलीकडील व्यक्त करतात पाहा. अशी मतचाचणी करायलाच. पाहिजे. सदस्यांचा कल त्याशिवाय कसा कळणार? विविध अंगांवर करावी. १. येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात. २. येथे थट्टामस्करीपासून ते उत्तम साहित्यापर्यंत, पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते. सुधीर कांदळकर.

देवदत्त Sun, 04/20/2008 - 12:51
अन्य बंधने नसल्यामुळे सहज वावरता येते. येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात. येथे थट्टामस्करीपासून ते उत्तम साहित्यापर्यंत, पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते.

ऐश्वर्या राय Sun, 04/20/2008 - 14:38
एक एक नमुनेदार माणसे भेटतात. मेंबरशिपच्या काउंटच्या तुलनेत इथे व्हरायटी खूप आहे, यू, नो. असाच एक नमूना, ऐश्वर्या राय (बच्चन नव्हे).

िव्कास०१५४ या स्थळावर यायला मला खुप खुप आवडते ...कारन मला वाच्नािच खुप आवड आहे आिन या सन्केतस्थळा वर उत्तम साहित्य, निवन बात्म्या,पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते. स्थळाबद्दल तात्यांचे आभार !!!! (तात्यांच्या लेख्नाचा िन्िस्स्म चाह्ता-िवकास िश््दे)े

विद्याधर३१ Sun, 04/20/2008 - 20:31
नवनवीन कल्पना वेगवेगळे विषय हाताळले जातात. केवळ वैचारीक किंवा मराठी भाषेचा उध्दार करण्यासाठी असा आव कधी हे संस्थळ आणत नाही यामुळे व इथल्या जिवंतपणामुळे इथे वारंवार यावेसे वाटते.. विद्याधर

केशवसुमार Mon, 04/21/2008 - 09:13
मिसळपाव का आवडते? हा काय प्रश्न झाला?!! छा... हे म्हणजे पिवळ पितांबर झालं.. अहो सगळच आवडते... पण तुम्हाला हा प्रश्न मुळात पडालाच का हे सांगा? इथल काय आवडत नाही विचारा.. म्हणजे सुधारणा करता येतील.. पण का आवडते?!!!!! छा छा छा....... केशवसुमार टिळक. अवांतर : कैल द्यायची नवीन सुविधा उत्तम आहे..हे वे. सा. न. ल.

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 09:18
पण तुम्हाला हा प्रश्न मुळात पडालाच का हे सांगा? अहो तसा प्रश्न मुळी पडलाच नव्हता, परंतु कौल ही सुविधा मिपावर नव्याने सुरू केली होती त्याची चाचणी करून पाहण्याकरता म्हणून हा कौल टाकला! ;) आपला, (हुश्शार) तात्या.