✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दुरावा!

प
पिवळा डांबिस यांनी
Sat, 04/19/2008 - 08:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13261 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

वा! मस्तच!

प्रमोद देव
Sat, 04/19/2008 - 09:14 नवीन
अतिशय हृद्य वळण! वातावरण निर्मिती अतिशय प्रभावी आणि झटका देखिल तितकाच प्रभावी. जोरका झटका धीरेसे लगे.... सारखी अवस्था झाली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Sat, 04/19/2008 - 09:49 नवीन
हृद्य वळण +१ (आईवडलांना/आजीआजोबांना असे अवघडल्यासारखे होते, राग येतो, अशा कथा खूप लोकांकडून ऐकल्या आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

असेच

नंदन
Sat, 04/19/2008 - 11:22 नवीन
म्हणतो, प्रमोदकाकांशी सहमत. बाकी तुमच्या ब्लॉगचा पत्ता द्या की. वाचायला नक्कीच आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

सुरेख..!

विसोबा खेचर
Sat, 04/19/2008 - 09:41 नवीन
आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... क्या बात है डांबिसा! सुरेख कथा...! अतिशय हृद्य वळण! प्रमोदकाकांनी अतिशय योग्य शब्द वापरले आहेत! अर्थात मिपा सोडून आम्ही इतरत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळावर लिहीत नाही. त्यामुळे ती प्रथम सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचा मान मिपाचाच!! अरे भाई, ये तो मिपाका सौभाग्य है! ;) काही चुका असतील त गोड मानून घ्या!! अरे मेल्या डाम्बिसा, चुका कसल्या? उत्तम लिहिलं आहेस! औरभी लिख्खो... आपला, ("प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला" हे वाचून त्या आजोबांइतकाच क्षणात हळवा झालेला!) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्तच रे

नीलकांत
Sat, 04/19/2008 - 09:56 नवीन
आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... खुप आवडलं हो... असंच येऊ द्या. नीलकांत
  • Log in or register to post comments

सुरेख !!!!

मदनबाण
Sat, 04/19/2008 - 10:06 नवीन
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... व्वा..... जबरदस्तच !!!!! (हिंदूस्थान प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments

दोन पिढ्या...

इनोबा म्हणे
Sat, 04/19/2008 - 10:37 नवीन
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... क्या बात है...डांबीसकाका. कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... आणा त्याला समोर :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो ....

छोटा डॉन
Sun, 04/20/2008 - 20:49 नवीन
आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ? जबरदस्त .... लाजवाब .... ह्रुदयस्पर्शी .... तडाखेबाज !!! बाकी विन्याच्या मताशी सहमत ... अवांतर : आपल्या ब्लॉगचा पत्ता द्यावा .... काय काय लिहले आहे ते वाचायची उत्सुकता आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

पिवळा डांबीस.....

विद्याधर३१
Sat, 04/19/2008 - 10:45 नवीन
म्हटल्यवर पुर्वी पिवळे सोनेरी द्रव्य आठवायचे.... आता वेगळ्या विषयावरचा ह लेख वाचून खूप छान वाटले. विद्याधर
  • Log in or register to post comments

वा..

प्राजु
Sat, 04/19/2008 - 11:04 नवीन
आमच्या घरातलाच प्रसंग आहे असं वाटतंय . अमेरिकेतलं पोर म्हणजे त्याला देवाचे श्लोक किंवा आपल्या संस्कृतीशी काही ही देणंघेणं नाही असा एक समजच असतो भारतात राहणार्‍या नातेवाईकांचा. आणि जेव्हा हीच अमेरिकेतली मुलं त्यांच्या अमेरिकन ऍसेंट मध्ये इंग्लिशमध्ये संवाद साधण्या बरोबरच , श्लोक म्हणतात, संस्कृती जपताना दिसतात तेव्हा एकतर अति कौतुक होतं किंवा तोंडात बोट घालण्याची वेळ येते. पण असा गैरसमज करून घेण्यापूर्वी या नातेवाईकांनी स्वत:च विचार करावा की या मुलांना जन्म देणारे आई-बाप ही आपलीच मुलं आहेत.. आणि आपण त्यांच्यावरजे काय संस्कार केले तेच संस्कार ते त्यांच्यामुलांवरही नक्कीच करणार.. शेवटी जसं पेरावं तसचं उगवतं.. लेख आवडला हे सांगने न लागे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर!

स्वाती दिनेश
Sat, 04/19/2008 - 11:42 नवीन
अतिशय हृद्य वळण! प्रमोदकाकांशी एकदम सहमत, दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... वा.. गोष्ट आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अनामिका
Sat, 04/19/2008 - 11:55 नवीन
डांबिस! अप्रतिम!..................... या शिवाय दुसरा शब्द मला तरी सापडला नाही. माझ्याच आयुष्यात घडलेला प्रसंग कुणीतरी शब्दबद्ध केलाय असेच वाटले . फक्त स्थळाच फरक आहे इतकच्.परदेशात न घडता देशात घडलाय एव्हढाच काय तो फरक म्हणायचा.. आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... वाचताना क्षणभर माझे देखिल डोळे पाझरले. (किशोरदांच्या गाण्यातली) "अनामिका"
  • Log in or register to post comments

पाणी आणलंत डोळ्यात !

जयवी
Sat, 04/19/2008 - 12:26 नवीन
पिवळा डँबिस...... अहो काय सुंदर उतारलीये कथा !! ते बोबड्या शब्दातलं "प्रालंबी विनती.." ऐकून पाणीच आलं डोळ्यात...... एकदम आतपर्यंत पोचली तुमची कथा.
  • Log in or register to post comments

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/19/2008 - 14:52 नवीन
डांबिसा, मस्त उतरली कथा. तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं... "प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला, अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला, चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...." काय लिहावे इथे, अप्रतिम प्रसंग, इथे आम्हीही जरा हळवे झालो ..............!!! >>पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. मस्त शब्दप्रयोग गोबर्‍यागुब-यासाठी !!! अवांतर :) आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून इतके सुंदर लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही . ( ह. घ्या )Image removed. आपला, डबल बॅरलवाला (उत्पल दत्त )
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sun, 04/20/2008 - 21:03 नवीन
सुरेख कथा. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेष्ट...

भडकमकर मास्तर
Sat, 04/19/2008 - 15:56 नवीन
पिडाकाका, बेष्ट.... नेमके प्रसंग आणि नेमक्या भावना पकडल्या आहेत ( उगीच मेलोड्रामा टाळलात ते फार बरे केलेत.... कारण त्याची फार भीती वाटते आम्हाला)...
  • Log in or register to post comments

सलाम!

ऋषिकेश
Sat, 04/19/2008 - 16:08 नवीन
बंदुकींच्या गोळ्यांसारख्या गाड्या आणि लोकरीचा गुंडा हे शब्द प्रयोग प्रचंड आवडले!!!! तुमच्या लेखनाला सलाम! आणि शेवटचं वळण तर अतिशय भारी!!! कथा फार म्हणजे फारच आवडली.. खुप सुंदर!! आणखी काय लिहू.. अजून अश्या कथा वाचायला नक्की आवडतील -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अप्रतिमच.........

अभिज्ञ
Sat, 04/19/2008 - 16:52 नवीन
अप्रतिमच......... फार म्हणजे फारच सुरेख. ह्रिदयाला भिडणारी कथा.अतिशय हृद्य ..... डांबिसकाका तुमचा हा लेख "नंबर वन "च. +++१. (भावनिक झालेला) अबब.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

शितल
Sun, 04/20/2008 - 02:33 नवीन
दुरावा, हा एकमेका॑न पासुन भिन्न सा॑स्क्रुतीक देशात राहिल्यामुळे वर वर वाटणारा आहे, पण आजी- आजोबा॑चे प्रेम हे नातव्॑डावर कधीही जास्तच असते. माझ्या सासर्‍या॑ना तर नातु बरोबर असला की कशाची ही तमा नसते. आम्ही यु. एस.ला येताना त्या॑चे डोळ्याचे पाणी काही था॑बता था॑बत नव्ह्ते. लेख खुप छानच आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

स्वाती राजेश
Sun, 04/20/2008 - 21:59 नवीन
कथा अगदी मनाला भिडते. दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... खासच..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर!

संजय अभ्यंकर
Sun, 04/20/2008 - 22:20 नवीन
डांबिसराव, फार सुंदर लेखन! कृपया आपल्या ब्लॉगचा पत्ता मिळु शकेल काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

डांबिसकाका, क्या बात है!

चतुरंग
Mon, 04/21/2008 - 05:59 नवीन
एकदम सुंदर! दुराव्याच्या भिंती ह्या प्रथम मनात असतात आणि आपण ठरवलं तर त्या प्रत्यक्षात येत नाहीत हे खरं. लहान मुले ही दोन पिढ्यातला दुवा असतात हे पक्कं माहीत असूनही मोठी माणसे त्यांच्याकडून का बरं लवकर काही शिकत नाहीत? चतुरंग
  • Log in or register to post comments

डांबिसकाका...........

धमाल मुलगा
Mon, 04/21/2008 - 10:18 नवीन
यू टूsssssssssss? मस्त! एव्हढं छान लिहिता, तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता? लिहा ना अजुन....आवडलं आपल्याला! एकदम बढियाँ !!!!!!!!
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. भारतात असते तर त्यांनी ते केलंही असतं. पण इथे अमेरिकेत त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
कसं एकदम 'रिऍलिस्टिक' वाटलं.
समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले... तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं... "प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला, अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला, चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
:-) उग्गाचच एक चिटुकलं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... अर्थ...संदर्भ काहीही नसेल कदाचित...पण ते चार साडेचार वर्षांचं पिल्लू सोवळ्याची चड्डी घालून देवघरात एकटंच तल्लीन झालेलं नजरेसमोर तरळलं. आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू! जियो डांबिसकाका...मस्त लेख, आणखी येऊद्या! आपला, - (शमीss) ध मा ल.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Mon, 04/21/2008 - 10:55 नवीन
एकदम प्रगल्भ ललित लेखन काका, खरच आवडले, अशाच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्‍या कथा तुमच्या शैलीत वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त!

मनस्वी
Mon, 04/21/2008 - 10:36 नवीन
लिहा ना अजुन....आवडलं आपल्याला!
  • Log in or register to post comments

काका मस्तच!

वरदा
Mon, 04/21/2008 - 20:08 नवीन
शब्दच नाहीत्...अप्रतिम कथा...डोळ्यात पाणी आलं वाचताना....
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पिवळा डांबिस
Wed, 04/23/2008 - 06:56 नवीन
मंडळी, ज्या आपुलकीने आणि उत्साहाने माझ्या या कथेचं तुम्ही स्वागत केलंत ते पाहून मी अवाक झालो आहे. तुमचे आभार मानायला खरोखरच माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. आपल्या मिपावरच्याच एका जेष्ट आणि मला आदरणीय असलेल्या सभासदाकडून आग्रह झाला म्हणून मी भीतभीतच ही कथा इथे प्रकाशित केली. तिला असा प्रतिसाद मिळेल अशी बापजन्मीही कल्पना केली नव्हती. उलट मला वाटलं होतं की आता मेंबरं बहुतेक, "काय हा बेवडा डांबिस वेड्यासारखं लिहितोय" असं म्हणून तुटून पडतील व लिखाण झोडून काढतील!!:)) पण मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलोय. तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता?... कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... धमाल्या, इनोबा, अगदी खरं आहे तुमचं! मिपावर येण्यामध्ये इथे लेखन करण्याचा माझा हेतू कधी नव्हता/नाहीच. कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. आमच्या प्रतिक्रियांमध्ये विद्वत्ता शोधून पहा, मिळणार नाही!!:)) अहो तसं लेखन करून लोकांचा अंत बघायचा असता तर "पिवळा डांबिस" हे नांव कशाला घेतलं असतं?:)) आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ? हा तुमचा मोठेपणा आहे छोटा डॉनसाब! आम्ही तुमचं लिखाण वाचलं आहे. जबरा सरस आहे!!! आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही . एकदम राखी सावंतने पांढरी साडी नेसून "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" आळवायला सुरवात केल्यासारखं वाटलं असेल नाही!!:)))) त्याचं असं आहे दिलीपराव, अहो आपण उगाचच माणसाच्या लिहिण्या-बोलण्यावरून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतीत कल्पना मांडतो. अहो एका माणसामध्ये देखील वेगवेगळी रूपे नांदत असतात. आणि इथे तर पिवळा डांबिस ही एक पूर्णपणे टोपणनांवी व्यक्तिरेखा!!:))) आमच्याबद्द्ल म्हणाल तर आम्हाला आमचे मानसगुरू कविवर्य बाकीबाब बोरकरांनी केलेले वर्णन यथार्थ लागू पडते, "रसलंपट मी, तरीमज अवचित गोसावीपण भेटे" अहो एका हातात स्कॉचचा ग्लास आणि दुसर्‍या हातात तळलेल्या कोलंबीची डिश घेऊन बसणाराही पिवळा डांबिसच असतो आणि आपल्या अभ्यासिकेत बसून उत्तररात्री बोरकरांच्याच, "रात्री समईशी वाचावी, ज्ञानेशाची अमृतओवी, कविता-स्नेहे वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा" या काव्यपंक्तींवर जीव ओवाळून टाकणाराही पिवळा डांबिसच असतो..... आणि कधीकधी या दोन्ही क्रिया तो मल्टायटास्क सुद्धा करतो!:)) आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू! अरे गैरसमज आहे तुझा धमाल्या!! इथे बाहेर थंडी असली तरी घरांना आतून हीटर्स असतात. माझा मुलगा लहान असतांना अस्साच टिचभर चड्डी घालून बागडायचा!! किंबहुना अजूनही त्याला (आणि त्याच्या बापाला!!) अंगभर कपडे घालायला भाग पाडणे हे त्याच्या आईपुढलं दैनिक आव्हान असतं!!!:)))))) तर मंडळी, असाच लोभ ठेवा!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

डांबिसा, हे लक्षात घे..

विसोबा खेचर
Wed, 04/23/2008 - 08:17 नवीन
कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. असाच विचार जर प्रत्येकाने केला असता तर तुझ्या इतक्या छान कथेला इतके उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले असते का हा विचार कर डांबिसा! टारगटपणा-थट्टामस्करी-टोपी उडावाउडवी तर अवश्य करावीच, परंतु त्याचसोबत कुणी काही चांगलं लिहिलं असेल तर त्याला मनमोकळी दाद देण्याचीही मिपाकरांची पद्धत आहे हे तू लक्षात घ्यावंस डांबिसा..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

डांबीस

विजुभाऊ
Wed, 04/23/2008 - 11:54 नवीन
डांबीस काका तुमचा लेख आणि तुमचे मिपाकरांना निवेदन एकदम निखळ मनाला डायरेक्ट हात घालतं. खूप दिवसानी असं भिडणारे काहीतरी वाचायला मिळाले तुम्ही असेच लिहिते रहा. ही इच्छा मी तुमच्या वाढदिवशी सुद्धा व्यक्त करेन :::आपला लेख वाचुन काहीतरी शब्दात न मावण्यासारखा वाटलेला विजुभाऊ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा