वाढणी:
३-४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:
३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
अर्धा किलो भेंडी, ३ कांदे, १ मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लसूण पेस्ट
१ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पूड, १ चमचा लिंबाचा रस, तिखट-मीठ
तळणासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. पाव इंच लांबीचे तुकडे करून तेलात तळून घ्या.
कांदे, टोमॅटो, मिरची सर्व बारीक चिरून घ्या. थोड्या तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
त्यात लसूण, मिरची व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला व धणेपूड घाला.